Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकांच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरण्याची तयारी
त्या संदर्भात महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षण अधिकार, मुख्याध्यापक, शाळा निरिक्षक आणि अधिक्षकांना एक निवदेन पत्र पाठवले असून त्यात विलगिकरण कक्षाबाबत तयारी करण्याची सुचना दिली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता मुंबई महापालिकांच्या शाळा (BMC Schools) विलगिकरण कक्ष (Quarantine Centre) म्हणून वापरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्या संदर्भात महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षण अधिकार, मुख्याध्यापक, शाळा निरिक्षक आणि अधिक्षकांना एक निवदेन पत्र पाठवले असून त्यात विलगिकरण कक्षाबाबत तयारी करण्याची सुचना दिली आहे.
विलगिकरण कक्षासाठी महापालिकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शाळांची यादी तयारी करण्यास सांगण्यात आले आहेत. त्याचसोबत शाळेची एकूणच परिस्थिती पाहता त्याचे कोणतेही काम सुरु नाही ना याची खात्री करुन घ्यावी असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पालिकांच्या शाळांमधील वर्गातील पंखे आणि अन्य सुविधा नसल्यास त्याची समस्या सोडवावी. उपशिक्षण अधिकारी, अधिक्षक यांनी शाळांमध्ये प्रतिनिधी नेमावा असे ही सांगण्यात आले आहे. तर महराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडायची असल्यास घरीत थांबून नियमाचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचसोबत महाराष्ट्राची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी 20 एप्रिल पासून लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.(प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती)
BEST BUS चे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये; कोरोना रुग्णांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार - Watch Video
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. तसेच कोरोनच्या गंभीर आजावर आतापर्यंत कोणतेच औषध उपलब्ध नाही आहे. मात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वोतोपरी उपचार करत आहेत. तर कोरोनामुळे उपचार घेऊन बहुतांश जणांची प्रकृती सुद्धा सुधारल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तर आता कोरोनावर मात करण्यासाठी कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक अभ्यास केला जात आहे.