Coronavirus: कोविड सेंटर कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा दावा, BMC महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेचा गंभीर आरोप

या वेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आमच्या असे निदर्शनास आले आहे की, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.

BMC Mayor Kishori Pednekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकटात मुंबई महापालिका (BMC) राबवत असलेल्या उपक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. मुंबई महापालिकेने राबवलेल धारावी पॅटर्न फिलिपिन्स देशातही राबवला जाणार असल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते. असे असताना दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेच्या कोवीड सेंटर कंत्राटात (Covid Centres Contract) घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेने मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना या प्रकरणात लक्ष केले आहे. पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वत:च्याच मुलाला हे कंत्राट दिल्याचा मनसेचा आरोप आहे. दरम्यान, पुत्र मोहातून शिवसेना (Shiv Sena) बाहेर पडेल का, असं ट्वीटही देशपांडे यांनी केलं आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दादर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप केले. या वेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आमच्या असे निदर्शनास आले आहे की, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. महापौरांनी आपल्या पदाचा गैर वापर करत आपल्याच मुलाला कोविड संटरचे कंत्राट दिले आहे. तसेच, महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांनी गैरमार्गानं आपल्याच कंपनीकडे हे काम घेतले आहे. इतर कोणालाही न बोलावता एखादे काम परस्परच दिले जाते. त्याचे अॅग्रीमेंट कले जाते, यातच सर्व काह आले, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

पुढे बोलताना, संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकट हे एक युद्ध आहे. या युद्धात कोरोनाला पराभूत करण्यसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे. कोणीही राजकारण करु नये, असं अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही या काळात आपापल्या परीने नागरिकांना अडीअडचणीत आणि लॉकडाऊन काळात मदत करत होते. सत्तेत असलेली शिवसेना मात्र त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती. (हेही वाचा, Dharavi Pattern Of BMC: फिलिपिन्स सरकार राबवणार मुंबई महापालिकेचा धारावी पॅटर्न)

आपल्या कामाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृहच चालू दिले जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत. असे असताना मुंबई महापालिकेचे सभागृहच का बंद, असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif