Coronavirus: ऐरोली परिसरात Mindspace Complex येथे कोरोना व्हायरस बाधित 1 रुग्ण; इमारत रिकामी केली

बाळासाहेब सोनावने यांनी दिलेल्या माहितीनुसार, माईन्ड स्पेस येथे आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णावर मुंबई येथील कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली येथील माईन्ड स्पेस कॉम्पलेक्स (Mindspace complex) मधील एक इमारत रविवारी (15 मार्च 2020) खाली करण्यात आली. येथील एका इमारतीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास कोरोना व्हायरस (Coronavirus) लागण झाल्याची माहिती मिळताच हा निर्णय घेण्यात आला. माईन्ड स्पेस हे नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation ) अंतर्गत येणारे मोठे कॉम्पलेक्स आहे. इथे विविध आयटी कंपण्या आणि औद्योगीक कंपन्यांची कार्यालये आहेत.

नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावने यांनी दिलेल्या माहितीनुसार, माईन्ड स्पेस येथे आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णावर मुंबई येथील कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

पुढे बोलताना डॉ. बाळासाहे सोनावने यांनी सांगितले की, माईन्ड स्पेस कॉम्पलेक्स येथील एका इमारतीत असलेल्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास कोरोना व्हायरस बाधा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर सरकारी आदेश आणि प्रोटोकॉलमुळे ती इमारत खाली करण्यात आली.

पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक व्यक्ती फिलीपीन्स येथून 40 दिवसांच्या व्हिसावर भारतात आला होता. तो वाशी एथील एका मशिदीत राहात होता. त्याला कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे दिसली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Coronavirus In Maharashtra: नवी मुंबई येथील Mindspace Airoli मध्ये Majesco कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण; सफाईसाठी ऑफिसेस बंद)

या अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले की, हा व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी वाशी येथे आला होता. तो 3 ते 12 मार्च या कालावधीत वाशी येथे राहात होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 9 व्यक्तींची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला.