Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला, 325 जणांचा मृत्यू

या संख्येत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 6,86,462 जणांसह रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,52,734 रुग्णांचाही समावेश आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आढळणाऱ्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या (Coronavirus Cases In Maharashtra) प्रतिदिन सरासरी 20,000 ते 25,000 या प्रमाणात राहिली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने (Health Department Maharashtra) दिलेल्या माहितीनुसार आज (9 सप्टेंबर) दिवसभरात 23,816 कोरोनाव्हायरस संक्रमित आढळले आहेत. 13,906 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागने माहिती देताना पुढे म्हटले आहे की, राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,67,349 इतकी झाली आहे. या संख्येत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 6,86,462 जणांसह रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,52,734 रुग्णांचाही समावेश आहे. एकूण मृतांचाही समावेश एकूण संख्येत (9,67,349) आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, राज्यातील कोरना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 70.96% इतका आहे. तर राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या मृत्यूचे सरासरी प्रमाण 19.81% इतके आहे. राज्यात आतापर्यंत 16,11,280 नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आली आहे. तर 37,644 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्या आले आहे. (हेही वाचा, Coronavirus Update in India: देशातील 60% कोरोना बाधित केवळ 5 राज्यांमध्ये; मागील 24 तासांत भर पडलेल्या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्य अव्वल)

दरम्यान, महाराष्ट्रातील आकडेवारीचा विचार करताना मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येबाबतही उत्सुकता असते. मंबई महापालिकने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात 2,227 कोरोना व्हायरस संक्रमित आढळून आले. 839 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 43 जणांचा मृत्यू झाला. मंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,60,744 इतकी आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार असलेल्या 25,659 रुग्णांसह आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या 1,26,745 आणि मृत्यू झालेल्या 7,982 रुग्णांचाही समावेश आहे.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद