Lockdown: राज्यात कलम 188 अन्वये 72698 गुन्हे दाखल 15434 जणांना अटक: गृह मंत्रालय
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर विभागी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेऊन आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, टिकटॉक आदींच्या माध्यमातून काही समाजकंटकांवर बारीक लक्ष ठेऊन आहे. सायबर पोलीसांनीही सोशल मीडियावर विद्वेश पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट लॉकडाऊन (Lockdown) काळात राज्यात राज्यात कलम 188 अन्वये 72698 गुन्हे दाखल 15434 जणांना अटक केली आहे. तसेच, विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पोलीसांनी 2 कोटी 74 लाख 43 हजार 394 (27443394) इतका दंडही आकारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने दिली आहे. कोरोना व्हायरस संक्रमनाची गंभीर दखल घेत लॉकडाऊन 100% यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. परिणामी पोलिसांना गर्दीत शिरावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर विभागी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेऊन आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, टिकटॉक आदींच्या माध्यमातून काही समाजकंटकांवर बारीक लक्ष ठेऊन आहे. सायबर पोलीसांनीही सोशल मीडियावर विद्वेश पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे. सायबर कायद्याखाली राज्यात एकूण 218 गुन्हे दाखल केले आहेत. यातील 8 गुन्हे अदखलपात्र आहेत. तसेच, ऑडिओ क्लिप्स, YouTube, गैरवापर केल्या प्रकरणी 38 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खाली दिलेली महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची जिल्हानिहाय आकडेवारी ही 15 एप्रिल 2020 पर्यंतची आहे. (हेही वाचा, मुंबई: कोरोना व्हायरसमुळे निधन झालेल्या हेड-कॉन्स्टेबलला पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली)
ट्विट
लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र, नागरिकांना प्रदीर्घ काळ घरात बसण्याची सवय नसल्याने काही ना काही कारणं काढून नागरिक घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी नागरिकांना पांगविण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत. अनेकदा पोलिसांच्या विनंतीस मान न देता गर्दी करतानाही दिसत आहेत. अशा वेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी पोलीस आणि नागरिक यांच्यात संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)