बीड: Lock Down निमित्त टाकळी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय; विनाकारण हिंडताना आढळताच काढणार गाढवावरून धिंड
बीड (Beed) जिल्ह्यातील टाकळी गावाच्या अख्तयारीत लॉक डाऊन काळात विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून पहिल्या वेळेसाठी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे तर सलग तीन वेळा एखादा व्यक्ती फिरताना आढळला तर चक्क त्या व्यक्तीला 500 रुपये दंड आणि गाढवावरून धिंड काढली जाणार आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट मागील काही दिवसात अधिकच तीव्र झाले असल्याने आता राज्यातील लॉक डाऊनचे (Lock Down) नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. मात्र कितीही वेळा आवाहन करून, प्रसंगी शिक्षा करूनही काही मंडळी हे नियम धाब्यावरच बसवत आहेत, अशा महाभागांसाठी आता बीड (Beed) जिल्ह्यातील टाकळी ग्रामपंचायतीने एक अनोखा मार्ग निवडला आहे. प्राप्त माहितीनुसार, आता टाकळी गावाच्या अख्तयारीत लॉक डाऊन काळात विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून पहिल्या वेळेसाठी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे तर सलग तीन वेळा एखादा व्यक्ती फिरताना आढळला तर चक्क त्या व्यक्तीला 500 रुपये दंड आणि गाढवावरून धिंड काढली जाणार आहे. याबाबात ग्रामस्थांनी निर्णय घेतला असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. Covid-19: बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय; आता GIS मॅपिंगद्वारे मिळवता येणार कोरोनाग्रस्तांच्या परिसराची माहिती
प्राप्त माहितीन्वये, मागील काही दिवसात लॉक डाऊन असतानाही अनेक जण टाकळी गावात विणकर घराबाहेर पडत होते, त्यांना समजवण्यासाठी ग्राम पंचायती कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंचाच्या सूचनेनुसार या निर्णयाची गावात दवंडी पिटवून माहिती घोषणा करण्यात आली आहे. गावच्या पारावर बसून गप्पा मारणाऱ्यांनाही चाप घालण्यासाठी सरपंचांनी पाराला डांबर फासण्याचा निर्णय घेतला आहे.जर का असे होऊ द्यायचे नसेल तर सर्वांनी आपल्या घरातच थांबून सहकार्य करावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने वेगवेगळे तब्बल 146 भाग सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 320 कोरोना बाधीत आढळून आले असून त्यापैकी 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 जणाची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली आहे.