Coronavirus: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा
6.4 रिश्टर स्केल ही भूकंपाची नोंद ऐकून शरद पवार यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी प्रशासन कामाला लावले आणि काही तासांत ते घटनास्थळी पोहोचले. खालील व्हिडिओ नेमका त्याच काळातला आहे. हा व्हिडिओ नेमका कधिचा आहे ती तारीख नेमकी समजू शकली नाही. मात्र, युट्युब, सोशल मीडियावर हा व्हिडिओ आजही लोकप्रिय आहे.
Inspirational Video of Sharad Pawar: पाव शतकांहून अधिक काळ लोटून गेला त्या घटनेला. तरीही त्या घावाच्या वेदना महाराष्ट्र आजही विसरला नाही. महाराष्ट्रावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या निमित्ताने ती परिस्थिती, तो काळ आणि अशा संकटाच्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याने दाखवलेली दमदार कामगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे तेव्हा मुख्यमंत्री होते. 30 सप्टेंबर 1993 ची ती पहाट. गणेशोत्सव विसर्जनाचा तो दिवस. अचानक महाराष्ट्र हादरुन गेला. जमीन थरथरत होती. घरे हालत होती. कोणालाच काही समजत नव्हते. भूकंप होत होता. लातूर जिल्ह्यातील किल्लारी (Killari Earthquake 1993) या गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात 52 गावांमधधील तब्बल 30 हजार घरं धरणीनं पोटात घेतली. 16 हजार लोक जखमी झाले. मृत्यूंचा आकडा वेगवेगळा सांगितला जातो. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 6.4 रिश्टर स्केल इतकी झाली होती.
मुख्यमंत्री शरद पवार यांना घटनेची माहिती कळली. 6.4 रिश्टर स्केल ही भूकंपाची नोंद ऐकून शरद पवार यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी प्रशासन कामाला लावले आणि काही तासांत ते घटनास्थळी पोहोचले. खालील व्हिडिओ नेमका त्याच काळातला आहे. हा व्हिडिओ नेमका कधिचा आहे ती तारीख नेमकी समजू शकली नाही. मात्र, युट्युब, सोशल मीडियावर हा व्हिडिओ आजही लोकप्रिय आहे. अनेक लोक हा व्हिडिओ वारंवार पाहतात. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)
व्हिडिओ
मुख्यमंत्री असलेले शरद पवार एका पालकाच्या भूमिकेत असलेले व्हिडिओत दिसतात. परिस्थितीचे पूर्ण आकलन झालेले शरद पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. निधी आणि मधतीची काळजी करु नका. अवघा महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे. गावातील सर्व नागरिकांना योग्य उपचार मिळतील. जीवनावश्यक वस्तूं त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातील याची काळजी घ्या. ज्या कुटु्ंबातील अनेक लोकांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या मुलाला त्याच्या संपत्तीचा वारस बनवा. त्यात इतर कोणाला मध्ये घुसू देऊ नका. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असताना जर माल कमी पडला तर तो आगोदर गरीबाला द्या. ज्याचे कोणी नाही त्याला द्या. घरं उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी करा. त्यानुसार सर्व यंत्रणा कामाला लावा, अशा सूचना मोठ्या धिराणे आणि जबाबदारीने देताना शरद पवार दिसता. हा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.