मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कोविड 19 चे नियम धाब्यावर बसवत पब्स रात्री उशिरापर्यंत सुरूच

यामध्ये नियमांची पायमल्ली होत असताना पहायला मिळाली आहे.

मुंबई मध्ये पुन्हा वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. दरम्यान एकीकडे प्रशासन कोरोना फैलाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करत आहे पण मुंबई शहरातील काही उच्चभ्रू भागात असलेल्या पब आणि क्लब्समध्ये मात्र सर्रास नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत पब्ज सुरू असल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धुडकावून लावल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या असेच काही व्हिडिओ वायरल होत आहेत.

जुहू, विलेपार्ले या भागामध्ये रात्री उशिरापर्यंत पब्ज सुरू असल्याचं पहायला मिळालं आहे. जुहू मध्ये आर अड्डा या पब्ज मध्ये लोकांची गर्दी दाखवणारा एक व्हिडिओ वायरल होत आहे. सध्या 11 नंतर हॉटेल,पब्ज सुरू ठेवण्यास परवानगी नाही. पण तरीही असे प्रकार सुरू आहे.

नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत पब्ज

विलेपार्ले मध्ये 'Barrel Mansion' हा पब पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू असल्याचं निदर्शास आलं आहे. यामध्ये नियमांची पायमल्ली होत असताना पहायला मिळाली आहे. या प्रकारावर बोलताना आज मुंबईचे पालकमंत्री अस्मल शेख यांनी जी हॉटेल्स, पब्ज रात्री उशिरा पर्यंत सुरू आहे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं पुन्हा सांगितलं आहे. बीएमसी वेळोवेळी धाड टाकत कडक कारवाई करत असल्याचेही नमूद केले आहे.

ANI Tweet

दरम्यान काही दिवसांपूर्वी वरळीचे आमदार आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही काही पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं पहायला मिळालं होते तेव्हा अधिवेशनादरम्यान सभागृहात माहिती देताना त्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.