BMC Guidelines for Holi 2021: यंदा मुंबईत धुलिवंदन नाही! कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बीएमसीने जारी केले आदेश
मुंबई महापालिकेने याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार यंदा मुंबईत कोणत्याच प्रकारे होळी साजरी करता येणार नाही. कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
मुंबई शहरात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्येचा फटका यंदाच्या होळी उत्सवास (Holi 2021) बसला आहे. कोरोना (Coronavirus ) रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) काही कठोर पावले टाकते आहे. त्यामुळे यंदा मुंबईत होळी उत्सव साजरा करता येणार नाही. मुंबई महापालिकेने याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार यंदा मुंबईत होळी उत्सव साजरा करता येणार नाही. कोविड 19 संक्रमितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी होळी उत्सव साजरा करता येणार नाही. मुंबई महापालिकेने याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार यंदा मुंबईत कोणत्याच प्रकारे होळी साजरी करता येणार नाही. कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
धुलीवंदन असो किंवा इतर कोणतेही कारण. गर्दी करणाऱ्या मंडळींवर साथरोग नियंत्रण 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भादंवि 1960 अन्वये योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine: मोठा निर्णय, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे होणार कोरोना लसीकरण; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती)
दरम्यान, मुंबई शहरात आज दिवसभरात (सायंकाळी 6 पर्यंत) कोरोना व्हायरस संक्रमित 3512 रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना मुळे 8 जणांचा मृत्यू झाला. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,69,426 इतकी आहे. तर 11,600 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात मुंबईतून 1203 रुग्ण बरे झाले आहेत व सध्या मुंबईमध्ये 27672 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.