Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

यानुसार राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67,655 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात (Coronavirus In Maharashtra) काल कोरोनाचे 2487 नवे रुग्ण आणि 89 मृत्यूची नोंद झाली होती. यानुसार राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67,655 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 29,329 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 2286 जणांनी आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे प्राण गमावला आहे. या महामारीत सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत (Mumbai) काल नव्या 1 हजार 244 नव्या रुग्णांची आणि 52 मृत्यूची नोंद झाली होती. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 464 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याच धाटणीची परिस्थीती पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे खाली दिलेल्या तक्त्यातून जाणून घ्या.

तत्पूर्वी तुम्हाला ठाऊकच असेल की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा पुढील संपूर्ण महिना म्हणजेच 30 जून पर्यंत अधिकृत लॉक डाऊन ची घोषणा केली होती. याकाळात रात्रकालीन संचार बंदी असणार आहे. राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी पंथय प्रमाणात उद्योग व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची सुद्धा महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे. आजपासून अनलॉक 1 चा पहिला टप्पा सुरु होत आहे. महाराष्ट्रात तुम्ही राहात असणारा जिल्हा हा रेड, ग्रीन, ऑरेंज पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (31 मे 2020 , रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 39686 1279 16791
ठाणे 9585 200 3400
पुणे 7919 329 3699
औरंगाबाद 1501 65 986
नाशिक 1135 66 893
रायगड 1108 39 573
पालघर 1018 30 378
सोलापुर 897 70 371
जळगाव 616 72 277
अकोला 584 28 319
नागपुर 574 10 358
सातारा 523 16 148
कोल्हापुर 457 4 150
रत्नागिरी 264 5 98
अमरावती 226 16 124
हिंगोली 149 0 98
धुळे 140 16 86
यवतमाळ 130 1 99
जालना 125 0 54
लातुर  125 3 60
अहमदनगर 120 6 57
सांगली 112 1 58
नांदेड 111 6 86
उस्मानाबाद 73 1 19
गोंंदिया 66 0 32
परभणी 63 1 3
बुलडाणा 62 3 33
बीड 47 0 13
नंदुरबार 35 3 20
गडचिरोली 35 0 8
सिंधुदुर्ग 33 0 8
भंडारा 32 0 9
चंद्रपुर  25 0 15
वर्धा 12 1 0
वाशिम 8 0 6
अन्य जिल्हे 59 15 0
एकुण 67655 2286 29329

दरम्यान , काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील नागरिकांशी संवाद साधत आपल्याला आता पुनः श्च हरी ओम म्हणायचंय असे सांगितले होते. जरी आपण व्यवसाय उद्योग सुरु करण्याची मोठी रिस्क घेत असलो तरी नागरिकांनी निष्काळजी पणा करू नये असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. आपण या लढ्यासाठी सक्षम आहोत घाबरून जाऊ नका पण सतर्क राहा असे मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात सांगितले.