मुंबई: 3 दिवसांच्या बाळाला कोरोनाच्या संसर्गानंतर चेंबुर मधील साई हॉस्पिटल पूर्ण बंद; Covid 19 चा संसर्गाच्या केस असणार्‍या सैफी, जसलोक, हिंदुजा, भाभा हॉस्पिटलमध्येही अंशतः रूग्णसेवा खंडित

तर यासोबतच मुंबई शहरातील उच्चभ्रू समजली जाणारी सैफी हॉस्पिटल (Saifee Hospital), जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) आणि हिंदुजा हॉस्पिटल (Hinduja Hospital) देखील कोरोनाच्या प्रभावामुळे रूग्णांसाठी विशिष्ट प्रमाणातच सुरू ठेवण्यात आली आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आल्याने आता राज्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या चिंतेची बाब बनत चालली आहे. दरम्यान काल (1 एप्रिल) मुंबई मधील चेंबुर परिसरात प्रसुत झालेल्या मातेसह अवघ्या 3 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरात खळबळ पसरली आहे. सध्या चेंबुरमधील साई हॉस्पिटल (Sai Hospital Chembur) संपूर्ण सील करण्यात आले आहे. तर यासोबतच मुंबई शहरातील उच्चभ्रू समजली जाणारी सैफी हॉस्पिटल (Saifee Hospital), जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) आणि हिंदुजा हॉस्पिटल (Hinduja Hospital) देखील कोरोनाच्या प्रभावामुळे रूग्णांसाठी विशिष्ट प्रमाणातच सुरू ठेवण्यात आली आहे. यासोबतच कोरोना व्हायरसचा फटका भाभा हॉस्पिटलला देखील बसला आहे. दरम्यान सैफीमध्ये एका ज्येष्ठ डॉकटरला कोरोनाची लागण झाली होती. तर जसलोकमध्येही नर्स आणि रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या हॉस्पिटलमध्ये काही रूग्ण सेवा आता खंडीत करण्यात आल्या आहेत. मुंबई: जसलोक हॉस्पिटल मध्ये नर्स आणि रूग्ण कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्याने OPD Services, नव्या रूग्णांची भरती तात्पुरती स्थगित

चेंबुरमधील साई हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित नवजात बालकाचा जन्म 26 मार्च दिवशी झाला. त्यानंतर मंगळवारी नवजात बालक आणि माता या दोघांनाही कुर्लाच्या भाभा हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यावेळेस साई हॉस्पिटल स्वच्छता आणि निर्जुंतिकीकरणासाठी बंद करत असल्याचं कारण पुढे करण्यात आले होते. जसलोक मध्येही एका कॅन्सर पीडीत रूग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यासोबत एक नर्स देखील कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या हॉस्पिटलमधील इतर व्यक्तीदेखील आता क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आल्या आहे. मागील आठवड्यात सैफीमध्येही परदेशातून आलेल्या नातवामुळे सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाबाधित झाल्याचं सांगण्यात आलं होते. त्यानंतर हॉस्पिटलमधील काही वॉर्ड, मजले स्वच्छ करण्यात आले. पालिकेने तात्काळ सैफीलादेखील नोटीस पाठवली होती.

महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आहे. सुरूवातीला अनेकांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश होते.मात्र आता शहरातील खाजगी आणि काही सरकारी हॉस्पिटलमध्येही रूग्णांना दाखल केले जात आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 338 पर्यंत पोहचला आहे. तर कोरोनामुळे 16 जणांचा बळी गेला आहे. खबरदारीचा उपायम्हणून मुंबईत अनेक दाटीवाटीचे भाग मुंबई पोलिसांनी सील केले आहेत. यामध्ये भेंडीबाजार, बेहराम बाग, वरळी कोळीवाड्यासह 100 अधिक भाग आणि वस्त्यांचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif