Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 85, 975 पोहचली आहे. यापैकी 43, 591 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील कोविड विशेष रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई सोबतच पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक आणि राज्यभरातील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घ्या.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात काल, 7  जून रोजी कोरोनाबाधितांच्या आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली होती. 7  जून रात्री 10 वाजेपर्यंत राज्यात नव्या 3007 कोरोना रुग्णांची आणि 91 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 85, 975 पोहचली आहे. यापैकी 43, 591 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील कोविड विशेष रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आजवर 3,060 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून 39, 314 जन हे या संकटातून बरे होऊन मुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई शहरात सुद्धा काल 1421 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती तसेच 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे मुंबईतील (Coronavirus In Mumbai)  कोरोना बाधित रुग्णांची संख्या 48 हजार 549 वर पोहोचली आहे. मुंबई सोबतच पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक आणि राज्यभरातील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासून पहा.

कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असताना राज्यात आजपासून अनलॉक चा 3  रा टप्पा सुरु झाला आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आज मुंबईतील काही खाजगी कार्यालये पुन्हा सुरु करण्यात आली आहे, तसेच बेस्ट बस ची सेवा सुद्धा पुन्हा सुरु होत आहे. आजपासून जिल्हा व राज्यांतर्गत प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही असेही सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील तुमचा जिल्हा रेड, ग्रीन, ऑरेंज पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 48774 1638 21190
ठाणे 13014 331 4836
पुणे 9705 406 5516
औरंंगाबाद 1965 92 1189
नाशिक 1521 89 1027
पालघर 1485 40 607
रायगड 1441 55 735
सोलापुर 1343 104 620
जळगाव 1049 109 451
अकोला 778 36 439
नागपुर 747 11 434
कोल्हापुर 647 8 335
सातारा 630 27 309
रत्नागिरी 354 10 159
अमरावती 293 18 167
धुळे 238 21 118
हिंगोली 213 0 163
अहमदनगर 203 8 101
जालना 188 4 120
नांदेड 169 7 108
यवतमाळ 160 2 115
सांगली 150 4 88
लातुर 137 4 102
उस्मानाबाद 124 3 59
सिंधुदुर्ग 113 0 18
बुलडाणा 87 3 48
परभणी 78 3 46
गोंदिया 68 0 58
बीड 55 1 39
गडचिरोली 42 0 27
नंदुरबार 40 4 28
भंडारा 39 0 24
चंद्रपुर 32 0 25
वर्धा 11 1 7
वाशिम 10 2 6
अन्य जिल्हे 72 19 0
एकुण 85975 3060 39314

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 46-50  च्या पुढील वयाचे अधिक रुग्ण समाविष्ट आहेत. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार त्यांच्यात आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3060 झाली आहे. त्यामुळे वय आणि अन्य व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी घाबरून न जाता विशेष काळजी आवर्जून घ्यावी.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now