Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहात असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी

राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 72,300 वर पोहचली आहे.मुंबईच्या पाठोपाठ ठाणे (Thane) , पुणे (Pune) , नाशिक (Nashik) , औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणुन घ्या.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Update In Maharashtra: काल, 2 जून 2020 रात्री 10 वाजेपर्यंच्या अपडेटनुसार राज्यात 2287 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ व 103 मृत्यूंची नोंद झाली होती. यानुसार राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 72,300 वर पोहचली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज नवीन 1225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले झाल्याने आजवर डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या 31,333 रुग्ण इतकी झाली आहे. सध्या राज्यात एकूण 38,493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी सविस्तर माहिती दिली होती. महाराष्ट्र हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot)  आहे, राज्यात मुंबई (Mumbai) शहरात देशातील सर्व प्रमुख शहरांच्या तुलनेत अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. तर मुंबईच्या पाठोपाठ ठाणे (Thane) , पुणे (Pune) , नाशिक (Nashik) , औरंगाबाद  (Aurangabad) या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेला तक्ता तपासा.

महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3730 झोन क्रियाशील आहेत. या भागात अद्याप कोणत्याही उद्योग व्यवसायांना परवानगी दिलेली नाही. याशिवाय राज्यातील जिल्ह्यांचे रेड, ग्रीन, ऑरेंज झोन मध्ये विभाजन करून त्यानुसार त्या भागात राबवायच्या उपाययोजनांची तयारी केली जात आहे. यापैकी तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 42216 1368 17213
ठाणे 10404 230 3732
पुणे 8196 348 4317
औरंगाबाद 1592 68 1060
नाशिक 1212 68 919
रायगड 1209 51 621
पालघर 1122 33 443
सोलापुर 934 75 443
जळगाव 760 72 324
अकोला 642 31 346
नागपुर 614 11 381
सातारा 562 22 178
कोल्हापुर 543 4 205
रत्नागिरी  304 5 118
अमरावती  245 16 138
हिंंगोली 191 0 106
धुळे 173 16 93
अहमदनगर 141 7 60
यवतमाळ 131 1 99
जालना 130 1 58
नांदेड 129 6 91
लातुर 125 3 69
सांगली 124 4 63
उस्मानाबाद 80 1 32
बुलडाणा 73 3 42
परभणी 71 1 24
गोंंदिया 66 0 45
सिंंधुदुर्ग  52 0 8
बीड 47 1 26
गडचिरोली 38 0 12
नंदुरबार 37 3 27
भंडारा 32 0 9
चंद्रपुर 26 0 24
वर्धा 9 1 1
वाशिम 8 0 6
अन्य जिल्हे 62 15 0
एकुण 72300 2465 31333

दरम्यान, राज्यात आजपर्यंत 4 लाख 83 हजार 875 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील 72 हजार 300 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणता येईल. तर खबरदारी म्हणून राज्यात 5  लाख 70 हजार 453 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 97 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now