Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

मुंबई पाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) , या जिल्ह्यात सुद्धा कोरोना थैमान घालत आहे.

Coronavirus | Photo Credits: Unsplash

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus In Maharashtra) आकडा काल,6 जून रोजी पुन्हा एकदा वाढलेला आढळून आला. आजवर राज्यात तब्बल 82968 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यात कालच्या दिवसभरात सापडलेल्या 2739 नव्या रुग्णांचा समावेश आहे. सद्य घडीला राज्यात 42 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, आजवर तब्बल 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे  काल दिवसभरात एकुण 120 मृत्युंची नोंंद झाली असुन आजवरचा एकुण मृतांचा आकडा हा 2969 इतका आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणार्‍या मुंबई (Mumbai) मध्ये सुद्धा काल कोरोनाचे 1 हजार 274 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, तर, 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) , या जिल्ह्यात सुद्धा कोरोना थैमान घालत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासुन पाहा.

प्राप्त माहितीनुसार, राज्यात सध्या कंटेनमेंट 3603 झोन क्रियाशील असून कालपर्यंत याठिकाणी एकूण 18 हजार 422 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 69.82 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांचे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. तुम्ही राहत असणारा कोणता जिल्हा रेड, ग्रीन, ऑरेंज झोन पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 47354 1577 19977
ठाणे 12464 322 4686
पुणे 9289 400 5195
औरंंगाबाद 1861 92 1181
नाशिक 1412 88 1012
रायगड 1411 55 717
पालघर 1386 39 581
सोलापुर 1261 96 620
जळगाव 963 109 411
अकोला 762 35 439
नागपुर  738 11 416
कोल्हापुर 638 6 334
सातारा 626 27 291
रत्नागिरी 352 10 158
अमरावती 289 18 166
धुळे 231 21 108
हिंगोली 206 0 163
अहमदनर 190 8 89
जालना 177 3 85
नांदेड 168 7 104
यवतमाळ 160 2 104
सांगली 145 4 86
लातुर 135 4 94
उस्मानाबाद 118 3 58
सिंंधुदुर्ग 113 0 17
बुलडाणा 86 3 48
परभणी 78 3 46
गोंंदिया 68 0 57
बीड 53 1 38
गडचिरोली 41 0 25
नंदुरबार 40 4 28
भंडारा 39 0 18
चंद्रपुर 31 0 25
वाशिम 9 2 6
वर्धा 9 1 7
अन्य जिल्हे 65 18 0
एकुण 82968 2969 37390

दरम्यान, कोरोनाच्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारात याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपवण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासून प्रयत्नशील आहे आता त्यात या व्हॅक्सिन किती कामी येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.