नागपूर: तबलिगी जमातीशी संबंधित 8 परदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान ही परदेशी मंडळी नागपूरमध्ये एका मशिदीमध्ये वास्तव्यास होती. त्यांच्यावर Foreigners Act आणि पर्यटक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Nagpur Police | Photo Credits: Twitter/ ANI

नागपूर शहरामध्ये 8 तबलिगी समाजाच्या (Tablighi Jamaat)  संबंधित परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ही परदेशी मंडळी नागपूरमध्ये एका मशिदीमध्ये वास्तव्यास होती. त्यांच्यावर Foreigners Act आणि पर्यटक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सध्या या सार्‍यांना ताब्यात घेऊन क्वारंटीन करण्यात आले असल्याची माहिती नागपूर तहसील पोलिस स्टेशनचे सिनियन इन्सेप्टर जयेश भांडारकर यांनी दिल्याची माहिती ANI Tweet च्या माधयमातून देण्यात आली आहे. मुंबई: तबलीगी जमातीच्या 150 जणांविरोधात Quarantine च्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस स्थानकात FIR दाखल

दरम्यान देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट असताना धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी होती. अशामध्ये तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्ली, निजामुद्दीन येथे मरकजचा कार्यक्रम केला. यामध्ये परदेशी नागरिकदेखील होते. आता या कार्यक्रमातील सहभागींमुळे देशात कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून मरकजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन केले आहे.

ANI Tweet

नागपूरमध्ये कोरोनाचे 19 रूग्ण असून काल एकाचा बळी गेला होता. दरम्यान 4 जण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत. सध्या शहरामध्ये 14 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याच्या आदेश आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1हजारांच्या पार गेला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत.