Coronavirus in Maharashtra: वाशीम जिल्ह्यातील एका वसतिगृहातील 190 विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण
यात जिल्ह्यातील एका वसतिगृहातील सुमारे 229 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी अमरावती, हिंगोली, नांदेड, वाशीम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र प्रथमदर्शनी तयार झाले आहे. कोरोनाचे शहरात असलेले लोन आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीम (Washim) जिल्ह्यात आज तब्बल 318 कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. यात जिल्ह्यातील एका वसतिगृहातील सुमारे 229 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी अमरावती, हिंगोली, नांदेड, वाशीम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील आहेत.
कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यााठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. तरीही कोरोना व्हायरस संसर्ग वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस शन्मुगराजन यांनी वसतिगृह परिसराचा आढावा घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार देवांग येथील निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशीवाय इतरही काही विद्यार्थी या वसतिगृहात असतात. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: राज्यात कोरोनाचा धोका वाढला; मुंबईमध्ये आज तब्बल 1167 रुग्णांची नोंद)
ज्या वसतिगृहात कोरोना संक्रमन झाले आहे. त्या वसतीगृहात अमरावती जिल्हासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थीही निवासाला असतात. वसतिगृहात कोरोना संक्रमित झालेल्या 190 लोकांमध्ये चार शिक्षकांचाही समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यात एक आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सिमेलगत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 याकाळात या परिसरात संचारबंदी आहे.