Coronavirus In Dharavi Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळल्याने आकडा 2830 वर पोहचला-BMC
तर धारावीत कोरोनाच्या आणखी 6 रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 2830 वर पोहचला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नवी मुंबईसह अन्य काही ठिकाणे ही कोरोनाची मुख्य हॉटस्पॉट बनली आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) मात्र कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. तर धारावीत कोरोनाच्या आणखी 6 रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 2830 वर पोहचला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर मिळवण्यात आलेले यश पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून धारावीतील कोरोनाची परिस्थिती सुधारत असून नव्याने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या सुरुवातील धारावीत प्रचंड रुग्णसंख्या आढळून आली होती. मात्र वेळोवेळी महापालिका आणि प्रशासनाने उपाययोजना केल्याने येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून कोरोनाची चाचणी, मास्कच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 27 हजारांच्या पार; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 16,429 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 423 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 लाख 23 हजार 641 वर पोहोचली असून मृतांचा आकडा आकडा 27,027 वर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.93% एवढा आहे. तर सध्या राज्य सरकारकडून अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना प्रवास करण्याची मुभा असणार असून ई-पासची आवश्यकता नसणार आहे. मात्र राज्यात अद्याप मंदिरे, जलतरण तलाव, जिम, धार्मिक स्थळ, सिनेमागृ आणि नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.