Coronavirus: पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरस बाधित 1 नवा रुग्ण; पुणे जिल्ह्यात COVID-19 संक्रमितांचा आकडा 17 वर पोहोचला
या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 126 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमण झाले आहे. हिच संख्या काल 114 इतती होती.
पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या एकने वाढून 17 वर पोहोचली आहे. आज (17 मार्च 2020) नव्याने आणखी एका रुग्णांची सीओव्हीआयडी-19 (COVID-19) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा रुग्ण पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील आहे. तो 14 मार्च या दिवशी अमेरिकेहून पुणे येथे आला होता. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Divisional Commissioner Deepak Mhaisekar) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.
प्रशासनाची 150 पथकं सज्ज
अधिक माहिती देताना दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस बाबत अवलंबलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुण्यात प्रशासनाची १५० पथकं सज्ज आहेत. ही पथकं घरोघरी जाऊन जनगागृती करणार, माहिती मिळवणार आणि कोरोना व्हायरसाल नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणार. विदेशातून पुणे येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगिकरण कक्षात निरिक्षणाखाली ठेवणार आहेत.
विलगिकरण कक्षांची सख्या वाढवली
पुण्यातील विलगिकरण कक्षांची संख्या वाढवली. सुरुवातील 500 इतकी असणारी विलगिकरण कक्षाची संख्या 250 इतकी वाढविण्यात आली आहे. ही 250 विलगिकरण कक्ष बालेवाडी येथे उभारण्यात येत आहेत. आणखीही काही कक्ष वाढविण्यात येणार आहेत, अशीही माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.
एएनआय ट्विट
..'त्या' नागरिकांवर कडक कारवाई करणार
विदेशगमन करुन भारतात येणाऱ्या नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. या सर्व नागरिकांना विलगिकरण कक्षात ठेवले जाईल. या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जे नागरिक सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. एक, दोन व्यक्तींसाठी आम्ही समाज धोक्यात घालू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या |
||
क्र | शहराचे नाव | रुग्णांची संख्या |
1 | पुणे | 17 |
2 | मुंबई | 07 |
3 | ठाणे | 01 |
4 | कल्याण | 03 |
5 | नवी मुंबई | 03 |
6 | नागपूर | 04 |
7 | यवतमाळ | 03 |
8 | अहमदनगर | 01 |
9 | औरंगाबाद | 01 |
एकूण | 40 |
आरटीओ कार्यालय, आधार केंद्र बंद राहणार
सरकारी कार्यालयं 7 दिवस बंद राहणार आहेत. केवळ पाणीपुरवठा, आरोग्य, वीज अशी कार्यालयं सुरु राहतील. परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत आरटीओ कार्यालयंही बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणीही आरटीओ कार्यालयात गर्दी करु नये. या काळात कोणत्याही वाहन चालवण्याच्या परवान्यांची नुतनीकरण होणार नाही. नवे परवाणे वितरीत केले जाणार नाहीत. बीएस 4 आणि इतर वाहनांची नोंदनी विविध शोरुम्स मध्ये केली जाऊ शकते. वाहन चालवण्याचा परवाना ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. येत्या 31 मार्च पर्यंत सर्व आधार केंद्र बंद राहतील. आधार कार्ड काढण्यासठी बायोमेट्रीक केले जाते. त्यामुळे परिस्तिती सामान्य होईपर्यंत एकही आधार काढले जाणार नाही, असेही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संक्रमीत रुग्णांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 126 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमण झाले आहे. हिच संख्या काल 114 इतती होती. देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार कोरोना व्हयारस नियंत्रणासाठी अधिक गंभीर आहे.