Mumbai Local Service: मुंबई लोकल ट्रेन प्रवासी संख्येत घट, कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी पाठ फिरवल्याची चर्चा

कालांतराने ती खुली करण्यात आली. आता सर्वसामान्य नागरिकही मुंबई लोकलमधून प्रवास करत आहेत. परंतू, या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

Mumbai Local (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) शहराची वाहिणी अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) प्रवासाकडे मुंबईकर प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाचा मोठा फटका मुंबई लोकल सेवेला बसल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50% इतकी करण्यात आली आहे. काही ठिकाणी कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबविण्यास सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली नव्हती. कालांतराने ती खुली करण्यात आली. आता सर्वसामान्य नागरिकही मुंबई लोकलमधून प्रवास करत आहेत. परंतू, या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. ताज्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 3 लाख तर पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2 लाखांनी कमी झाल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! लोकलवर पुन्हा निर्बंध घालण्याचा राज्य सरकारचा विचार)

दरम्यान, राज्य सरकारनेही कोरोना नियंत्रणासाठी अत्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी मुंबई लोकल सेवेवर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7 पर्यंत, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास सर्वसामान्यांना मुभा आहे. ही मुभा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून देण्यात आली आहे. ही मुभा मिळताच मुंबई लोकल प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, अल्पावधीतच मंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पुढे येऊ लागले आणि लोकल प्रवाशांची संख्या रोडावताना पाहाला मिळू लागले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif