Lockdown: लॉकडाऊन काळात कोणत्या टप्प्यात कोरोना व्हायरस संक्रमित किती नागरिकांचा मत्यू झाला? महाराष्ट्र, भारत संपूर्ण आकडेवारी

त्यात काही प्रमाणात यशही आले. पण, पूर्ण यश आले असे म्हणता येणार नाही. कारण देशभरात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या मृत्युचे प्रमाण पाहता ते धक्कादायक आहे.

Death In Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Toll Death in Maharashtra & India During Lockdown: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट नियंत्रणासाठी लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला. हा लॉकडाऊन महाराष्ट्र आणि संबंध देशभरात लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 24 मार्च या दिवशी लॉकडाऊन लागू करत असल्याची घोषणा केली. 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरातील 130 कोटी जनता घरामध्ये स्थानबद्ध झाली. अनेकांनी या टाळेबंदीचे वर्णन निष्ठुर असे केले. तर, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हा लॉकडाऊन फेल गेल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने 24 मार्च पासून पुढे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवत नेला. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. लॉकडाऊन लागू करुनही मृतांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन किती फायदेशीर ठरला यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, लॉडाऊनमुळे कोरोना व्हायरस संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूत घट होईल, असे मानले जात होते. त्यात काही प्रमाणात यशही आले. पण, पूर्ण यश आले असे म्हणता येणार नाही. कारण देशभरात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या मृत्युचे प्रमाण पाहता ते धक्कादायक आहे. जाणून घ्या लॉकडाऊन एक, दोन, तीन चार या काळात महाराष्ट्र आणि भारतात कोरोना व्हायरस संक्रमीत मृतांची आकडेवरी. (हेही वाचा, Lockdown: 527 ट्रेनने 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगार मूळ राज्यात परतले; पाहा मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नागपूर शहरांतून किती सुटल्या विशेष श्रमिक ट्रेन)

Coronavirus Lockdown 1.0:  लॉकडाऊन पहिला –महाराष्ट्र आणि भारतातील मृतांची संख्या

लॉकडाऊन कालावधी

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण

24 मार्च ते 14 एप्रिल 2020

 

महाराष्ट्र भारत --
एकूण रुग्ण –122

मृत्यू- 03

एकूण रुग्ण – 562

मृत्यू- 13

--
(*आकडेवारी संदर्भ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र)

 

Coronavirus Lockdown 2.0:  लॉकडाऊन दुसरा –महाराष्ट्र आणि भारतातील मृतांची संख्या

लॉकडाऊन कालावधी

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण

15एप्रिल ते 3 मे  2020

 

महाराष्ट्र भारत --
एकूण रुग्ण –2916

मृत्यू- 187

एकूण रुग्ण – 12,380

मृत्यू- 414

--
(*आकडेवारी संदर्भ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र)

 

Coronavirus Lockdown 3.0:  लॉकडाऊन तिसरा– महाराष्ट्र आणि भारतातील मृतांची संख्या

लॉकडाऊन कालावधी

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण

4 मे ते 17 मे 2020 महाराष्ट्र भारत --
एकूण रुग्ण –12974

मृत्यू- 548

एकूण रुग्ण – 42533

मृत्यू- 1373

--
(*आकडेवारी संदर्भ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र)

 

Coronavirus Lockdown 4.0:  लॉकडाऊन चौथा –महाराष्ट्र आणि भारतातील मृतांची संख्या

लॉकडाऊन कालावधी

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण रुग्ण, मृतांची संख्या

एकूण

18 मे ते 31 मे 2020 महाराष्ट्र भारत --
एकूण रुग्ण –35058

मृत्यू- 1249

एकूण रुग्ण – 1,01,139

मृत्यू- 3163

--
(*आकडेवारी संदर्भ : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र)

*टीप: चौथा लॉकडाऊन अद्यापही सुरु आहे. त्यामुळे या तक्त्यातील अकडेवारी अंतीम नाही. आकडेवारीत बदल शक्य

दरम्यान, पहिल्या तीन लॉकडाऊनमध्ये अतिशय काटेकोरपणा दिसला. मात्र, चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने नियमांना काहीशी शिथीलता दाखवली. त्यानुसार राज्यातील अत्यावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहिली. तसेच, इतरही उद्योग, व्यवसाय, दुकाने कार्यालयं सुरु ठेवण्यास केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रात 70 हजार उद्योगांना आपले उद्योग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 50 हजार उद्योग प्रत्यक्ष सुरु होऊ शकले आहेत. या उद्योगांमधून सुमारे 50 लाख कामगार काम करत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, शाळा-महाविद्यालये, सांस्कृतिक-धार्मिक-राजकीय कार्यक्रम व सोहळे, काही अपवाद वगळता सर्व प्रकारची विमान आणि रेल्वे वाहतूक अद्यापही बंद आहे.