IPL Auction 2025 Live

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; नंदुरबार, परभणी येथे संचारबंदी लागू

नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र, अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 15 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे

Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध, संचारबंदी लागू केली जात आहे. आता नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे 15 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी असेल. यासह परभणी जिल्ह्यात 24 मार्च सायंकाळी 7 ते 31 मार्च च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी. 6 दिवस परभणी जिल्ह्यात संचारबंदी असेल.

नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र, अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 15 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे. जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भरुड यांनीअ आवाहन केले आहे. नंदुरबारमध्ये आज 153 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. नंदुरबारमध्ये 48, शहादा-70, नवापूर-04, तळोदा-25, धडगाव-02 व बाहेरील जिल्ह्यातील 4 रुग्ण आहेत. (हेही वाचा: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल)

परभणी जिल्ह्यात 15 मार्चपासून 1758 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. म्हणूनच आता प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज 24,645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19,463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22,34,330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,15,241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे.