Coronavirus: BEST कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; मुंबईतील मृतांचा आकडा 178 वर
याबाबत ANI या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून. संबंधित रुग्णाला 3 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मुंबईत बेस्ट (BEST) कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून. संबंधित रुग्णाला 3 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा व्यक्ती मुंबईतील टिळक नगर (Tilak Nagar) परिसरातील रहिवाशी असून मागील काही वर्षांपासून बेस्ट मध्ये कार्यरत होता.या मृत रुग्णाची वैयक्तिक माहिती आणि नाव कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उघड करण्यात आलेले नाही. दरम्यान यासोबतच मुंबईतील कोरोना रुग्णाच्या मृतांचा आकडा हा 178 वर पोहचला आहे. चिंता वाढली: महाराष्ट्राचा Coronavirus मृत्युदर जगात सर्वाधिक; राज्यात एकूण 178 लोकांचा मृत्यू, तर 2,684 जणांना लागण
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मागील 24 तासात आणखीन वाढली आहे. यात कोरोना व्हायरस बाधित नव्या 117 रुग्णांची नोंद झाली. संबंधित 66 रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. तर उर्वरीत रुग्ण 44 पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांची संख्या 2801 इतकी झाली आहे. मुंबईतील 308 जागा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आज सकाळी मुंबईतील धारावी परिसरात 5 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या परिसरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 वर पोहोचली आहे. यात 7 रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.
ANI ट्विट
दरम्यान, देशातील रुग्णांची संख्या आता 11 हजाराच्या पार गेली आहे. कालपासून भारतात नवे 1076 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची संख्या 11,439 वर जाऊन पोहोचली आहे. मागील 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.