Coronavirus: 50 लाख रुपये किमतीचा अवैध सॅनेटायझर साठा जप्त; औरंगाबाद अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

या कारवाईत सुमारे 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर आढळून आले होते. या प्रकरणातील आरोपींनी स्वत:च्या घरातच बनावट बनावट सॅनिटायझरचा निर्मितीचा कारखाना सुरु केला होता.

Sanitizer | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्यात वितरीत करण्यासाठी भेसळयुक्त आणि बनावट सॅनेटायझर (Sanitizer) साठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. लवकरच हा साठा राज्यातील विविध ठिकाणी पाठविण्यात येईल अशी माहिती मिळताच औरंगाबाद (Aurangabad) अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) सतर्क झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील वाळूंज परिसरात एका कंपनीवर कारवाई करत तब्बल 50 लाख रुपयांचे बनावट आणि भेसळयुक्त सॅनिटायझर जप्त केले. कोरोना व्हायरस रुग्ण राज्यात आढळल्यापासून राज्यात केलेली ही बहुदा पहिलीच इतकी मोठी कारवाई आहे.

कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवत आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णयही घेतले जात आहेत. त्यासाठी नागरिकांना सूचना दिल्या जात आहे आणि अवाहनही करण्यात येत आहे. दरम्यना, काही समाजकंटकांकडून नागरिकांची दिशाभूल करुन फसवणूक केली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूंज येथेही असाच प्रकार घडला. येथील एका कंपनीत बनावट आणि भेसळयुक्त सॅनिटायझर तयार केले जात होते. तसेच, एक्सपायरी डेट संपलेल्या बॉटल्स आणि पाऊचवर बनावट स्टिकर्स लावले जात होते. अन्न व औषध प्रशासनास याची माहिती लागताच प्रशासनाने कडक करावई करत सर्व सॅनिटायझर जप्त केले. या सॅनिटायझरची किंमत 50 लाख रुपये असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणात किती लोकांना अटक झाली. या सर्वाचा करता करवीता कोण आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. प्रशासन प्रकरणाचा तपास करत आहे. (हेही वाचा, Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई)

दरम्यान, एक दिवसापूर्वीच पुणे येथेही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर आढळून आले होते. या प्रकरणातील आरोपींनी स्वत:च्या घरातच बनावट बनावट सॅनिटायझरचा निर्मितीचा कारखाना सुरु केला होता. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात होत असलेली सॅऩिटायझरची मागणी विचारात घेऊन अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा कारखाना सुरु केला होता. अजय शंकरलाल गांधी , मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी पुण्यातील प्रकरणात आलेल्या अटक आरोपींची नावे आहेत.