Coronavirus: 90 आणि 81 वर्षीय पती-पत्नीची कोरोनावर मात; मात्र लेकीने गमावले प्राण, वाचा भुसावळचे कुस्तीपटू चोखाजी आव्हाड यांच्या कुटुंबाची कहाणी
मात्र त्यांच्या 56 वर्षीय लेकीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
खान्देश की बिजली (Khandesh Ki Bijli) या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या माजी कुस्तीपटू चोखाजी आव्हाड (Chokhaji Awhad) यांनी वयाच्या 90 व्या वर्षी कोरोनावर (Coronavirus) मात केली आहे. भुसावळ (Bhusaval) येथील रेल्वे हॉस्पिटल मधून त्यांना डिस्चार्ज मिळाला असून आता ते सुखरूप घरी परतले आहेत. काहीच दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या 81 वर्षीय पत्नीला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यांनी सुद्धा या जीवघेण्या आजारावर मात करत आपल्या घरची वाट धरली आहे. एकीकडे अधिक वयाचे हे दांपत्य जरी कोरोनाला हरवून आले असले तरी त्यांच्या 56 वर्षीय लेकीला मात्र जीव गमवावा लागला आहे. याशिवाय आव्हाड यांना कोरोनाची लागण होताच कुटुंबातील अन्य 7 जणांना सुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले होते मात्र सुदैवाने त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आव्हाड हे रेल्वे चे कर्मचारी होते, त्यांनी स्टीम इंजिनचे चालक म्हणून काम केले होते. त्यांना 21 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती, त्याच दिवशी त्यांना रेल्वे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. याआधी काहीच दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या 81 वर्षीय पत्नीला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, या पतिपत्नीचे वय पाहता त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते, मात्र या दोघांनाही व्हेंटिलेटर वर ठेवण्याची किंवा ऑक्सिजन पुरवण्याची सुद्धा वेळ आली नाही. मुंबई पोलिसाच्या पत्नीने मांडली व्यथा, 'पतीला श्वसनाचा त्रास होतोय मात्र कोरोना रिपोर्ट हाती नसल्याने हॉस्पिटल सहकार्य करत नाही' (Watch Video)
चोखाजी आव्हाड यांच्या विषयी त्यांचा मुलगा नवीन याने सांगितले की, आव्हाड हे एक मानाचे कुस्तीपटू आहेत, त्यांनी आजवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. खान्देश की बिजली या नावाने त्यांची ओळख प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या वयाचा अर्धा भाग हा खेळाडू म्हणून घालवल्याने त्यांचे स्वास्थ्य आणि शिस्त कमाल आहे. त्याच जोरावर आज त्यांनी कोरोनाला सुद्धा माती चारली आहे. त्यांनी वाफेचे इंजिन चालवण्याचे काम केले होते, 1989 मध्ये म्हणजेच 31 वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.कुस्तीसोबतच त्यांच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वेने सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे.