Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात 8,395 जण कोरोना मुक्त, 9,489 नागरिकांना COVID-19 संसर्ग
त्यावरुन गणित मांडले असता राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96% इतका आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus in Maharashtra) संसर्गाचे प्रमाण काहीसे स्थिर होत असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात आज (3 जुलै) दिवसभरात 8,395 जण कोरोना मुक्त झाले. तर 9,489 नागरिकांना COVID-19 संसर्ग झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, राज्यात आज कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) 153 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूचे सरासरी प्रमाण हे 2.01% इतके आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकेडवारीत म्हटले आहे की, आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यावर रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या नागरिकांची संख्या 58,45,315 इतकी आहे. त्यावरुन गणित मांडले असता राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96% इतका आहे. सध्यास्थिती राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आणि कोविड केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 1,17,575 इतकी आहे. (हेही वाचा, Lockdown In Satara: साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, 'हे' आहेत नवीन नियम)
कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण, नागरिक शोधण्यासाठी आतापर्यंत 4,23,20,880 नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यापैकी 60,88,841 इतके नमुने पॉझिटीव्ह आले. टक्केवारीत सांगायचे तर ही संख्या 14.39% इतकी आहे. राज्यातील होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची संख्या आहे 6,32,949. तर संस्थात्मक असलेल्यांची संख्या आहे 4,422 इतकी.
राजेश टोपे ट्विट
कोरना विरोधात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र संपूर्ण देशात अव्वल आहे. विशेष म्हणजे आज दिवसभरातही महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपण सर्व राज्यांमध्ये लसीकरण मोहिमते अव्वल असल्याचे दाखवून दिले. आज (शनिवार, दि, 3 जुलै) रात्री आठ वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात 7,96,378 नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. दिवसभरातील नागरिकांच्या लसीकरणाचा शेवटचा आकडा (अंतिम) येईल तो 8 लाखांवर जाईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत 3,38,57,372 इतक्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.