Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकाडा आज स्थिर, मृतांच्या संख्येत वाढ
मात्र हे प्रमाण अधिक असले तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही महाराष्ट्रतच अधिक आहे. देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यात कोरोना व्हायरस चाचण्या अधिक प्रमाणात केल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या (Coronavirus Cases In Maharashtra) आज (9 सप्टेंबर) काहीशी स्थिर राहिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात 23,446 नवे कोरोना व्हायरस (COVID 19) संक्रमित आढळले. तर कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित 448 जणांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झालेल्या 14,253 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आजचा आकडा पाहता कालच्या तुलनेत थोड्याफार फरकाने तो सारखाच आहे. त्यामुळे हा आकडा स्थिर असल्याचे चित्र आज तरी दिसते आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येबाबत बोलायचे तर हा आकडा आता 9,90,795 इतका झाला आहे. हा आकडा मोठा दिसत असला तरी त्यात डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा मोठा आहे. राज्यात आतापर्यंत 7,00,715 नागरिकांना उपचार घेऊन बरे वाटू लागलल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना संक्रमित मृतांची संख्याही कमी नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 28,282 जणांना कोरोना व्हायरस संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज घडलीला 2,61,432 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे एकूण मिळालेले डिस्चार्ज, प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या या सर्वांचा मिळून आकडा 9,90,795 इतका असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा उपचारांमुळे बरे होण्याचा सरासरी दर (रिकव्हरी रेट) हा 70.72% इतका राहिला आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातील कोरना रुग्णांच्या मृत्यूदराचा विचार करता तोही 2.85% इतका राहिला आहे. राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा तपास करण्यासाठी आतापर्यंत 49,74,558 इतके नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात (कोरोना चाचणी) आले. त्यापैकी 9,90,795 इतके अहवाल पॉझिटीव्ह आले. एकूण चाचण्यांपैकी कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्ह येण्याचा दर 19.9% इतका राहिला आहे. (हेही वाचा, Health Ministry Issues Revised SOP: कोविड-19 संकट काळात पार पडणाऱ्या परीक्षांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना )
संपूर्ण देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे प्रणाण अधिक आहे. मात्र हे प्रमाण अधिक असले तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही महाराष्ट्रतच अधिक आहे. देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यात कोरोना व्हायरस चाचण्या अधिक प्रमाणात केल्या जात आहेत.