Coronavirus: मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण आकडा 2043 वर पोहचला

तर राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश वाढवले असून नागरिकांना वारंवार सुचना करुन त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तर मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सध्याची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश वाढवले असून नागरिकांना वारंवार सुचना करुन त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तर मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 2043 वर पोहचला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत.

राज्यात काही ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी नागरिक सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात. मात्र आता मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 2043 वर पोहचला असून यामध्ये 116 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे.(Coronavirus Lockdown च्या काळात अपरिहार्य कारणासाठी मुंबई बाहेर पडायची मिळू शकते परवानगी, mumbaipolice.gov.in वर मुंबई पोलिसांकडे अशी मागा मदत!)

दरम्यान, महाराष्ट्र राज्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन , 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संदर्भात कोणतेही नियम रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिल केले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.