मुंबई: नागरिकांना रेशनधान्य ते आरोग्ययंत्रणेतील कर्मचार्यांना तातडीने सुविधा यांची पुर्तता करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षा नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
महाराष्ट्रातील अशा समस्यांवर तातडीची मदत मिळावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने आता भारतामधील लॉकडाऊन अजून वाढवला जाणार का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्या अनेक गोर गरिबांच्या समोर रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. दरम्यान दिवसागणिक कोरोना बाधित वाढत असल्याने आता आरोग्ययंत्रणेवरील भारदेखील वाढला आहे. महाराष्ट्रातील अशा समस्यांवर तातडीची मदत मिळावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नागरिकांना रेशनधान्य मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोरोना लढाईतील अग्रदूत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, त्यांना पूर्ण वेतन अशा मागण्या त्यांनी आज राज्यपालांकडे केल्या आहेत. Coronavirus: काही तासात महाराष्ट्रात COVID 19 बाधित रुग्णांची संख्या 60 ने वाढली; राज्यात कोरोना बाधित एकूण 1078.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाल शेट्टी, खासदार मनोज कोटक, योगेश सागर यांचा समावेश होता. यावेळेस तबलिगी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे तसेच या विषयात कुठलेही राजकारण न करण्याची विनंती यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनातून केले आहे. सोबतच ठाण्यातील तरुणाला मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. आज आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात1078 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर पुण्यामध्ये आज सकाळपासून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या काही दिवसात कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभरात फीव्हर क्लिनिक्स ते कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि हाय रिस्क रूग्णांसाठी सुसज्ज हॉस्पिटल्सची विभागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.
Coronavirus Outbreak दरम्यान IRCTC च्या 'या' 3 खाजगी ट्रेनचं 30 एप्रिलपर्यंत बुकिंग रद्द : Watch Video
त्यानुसार आता अनेक ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाला संचारबंदीचे नियम कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई, पुण्यातील अनेक भाग बंद करण्यात आले आहे.