Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात आहेत किती रुग्ण?

तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित रुग्ण आहेत , त्यापैकी किती जण बरे झाले आहेत किती जणांचा मृत्यू झाला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Corona Update In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयातर्फे आज,सोमवार 4 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंंत राज्यात कोरोनाचे एकूण 12, 974 रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे . रविवारी म्हणजेच काल कोरोना रुग्णाच्या संख्येत 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानुसार रुग्णांचा एकूण आकडा हा 12,974 वर पोहचला आहे. यापैकी 10, 311रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून अन्य 548 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तसेच, 2115 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित रुग्ण आहेत , त्यापैकी किती जण बरे झाले आहेत किती जणांचा मृत्यू झाला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे.

तत्पूर्वी आपल्याला ठाऊकच असेल की, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार होऊ लागताच सुरुवातीपासूनच मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. अजूनही हे भाग रेड झोन मध्येच आहेत. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रात जिल्ह्यांची सुद्धा रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 
अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 8800 343
2 ठाणे 60 2
3 ठाणे मनपा 488 7
4 नवी मुंबई मनपा 216 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 212 3
6 उल्हासनगर मनपा 4 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 21 2
8 मीरा भाईंदर 141 2
9 पालघर 44 1
10 वसई विरार मनपा 152 4
11 रायगड 30 1
12 पनवेल मनपा 55 2
ठाणे मंडळ एकूण 10,223 371
1 नाशिक 12 0
2 नाशिक मनपा 43 0
3 मालेगाव मनपा 229 12
4 अहमदनगर 27 2
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 20 1
8 जळगाव 34 11
9 जळगाव मनपा 12 1
10 नंदुरबार 12 1
नाशिक मंडळ एकूण 413 30
1 पुणे 81 4
2 पुणे मनपा 1243 99
3 पिंप्री-चिंचवड मनपा 72 3
4 सोलापूर 7 0
5 सोलापूर मनपा 109 6
6 सातारा 37 2
पुणे मंडळ एकुण 1549 114
1 कोल्हापूर 10 0
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 29 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 2 1
5 सिंधुदुर्ग 3 1
6 रत्नागिरी 11 1
कोल्हापूर मंडळ एकुण ६१ 3
1 औरंगाबाद 5 0
2 औरंगाबाद मनपा 239 9
3 जालना 8 0
4 हिंगोली 42 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 2 0
औरंगाबाद मंडळ एकूण 197 10
1 लातूर 12 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 0 0
6 नांदेड मनपा 31 1
लातूर मंडळ एकूण 47 2
1 अकोला 12 1
2 अकोला मनपा 50 0
3 अमरावती 3 1
4 अमवरावती मनपा 31 9
5 यवतमाळ 79 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 2 0
अकोला मंडळ एकूण 198 12
1 नागपूर 6 0
2 नागपूर मनपा 146 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 4 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 158 2
1 इतर राज्य 28 4
एकूण 12, 974 548 

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा 42,533 वर पोहचला आहे. त्यापैकी 29,453 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 11,707 जणांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक माहिती आहे. दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे 1373 जणांचा बळी गेला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.