Coronavirus: जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
अशातचं आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील 5 पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे.
Coronavirus: राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. अशातचं आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्यामध्ये (Bungalow) काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील 5 पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांच्या वर गेला आहे. राज्यात मुंबई तसेच इतर उपनदरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसराचाही समावेश आहे. कळवा मुंब्रा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने या भागात मदत कार्य सुरू आहे. येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)
ठाण्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा 76 वर पोहोचला आहे. ठाण्यात सोमवारी दिवसभरात 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधीतांची संख्या 1 हजार 549 वर पोहचली आहे.