Corona Patient Dies By Suicide: थरारक! सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालयात कोरोनाबाधिताची गळा कापून आत्महत्या
कोरोनावर योग्य उपचार होत नसल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने अनेक कोरोना रुग्ण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशातचं आता सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आत्महत्येने एकचं खळबळ उडवली आहे. मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाने गळा कापून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
Corona Patient Dies By Suicide: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाचं अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. कोरोनावर योग्य उपचार होत नसल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने अनेक कोरोना रुग्ण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशातचं आता सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आत्महत्येने एकचं खळबळ उडवली आहे. मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये (Miraj Government Hospital) एका कोरोनाग्रस्त रुग्णाने गळा कापून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
हुसेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर मिरज येथील सरकारी कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. हुसेन यांनी आज पहाटेच्या सुमारास चाकूने गळा कापून आत्महत्या केली. हुसेन यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, हुसेन बाबुमिया मोमीन यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - Vasudev Narayan Utpat Dies: पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे कोरोनामुळे निधन)
हुसेन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गेल्या आठवड्यात मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुसेन मोमीन यांनी रुग्णालयात धारदार चाकूने आपला गळा कापून आत्महत्या केली. या प्रकरणी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हुसेन मोमीन यांचा मुलगा मस्तफा मोमीन आणि नातेवईकांनी त्यांच्या आत्महत्येविषयी संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिरज पोलीस करत आहेत.