Mumbai Blast Terrorist Yakub Memon: मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद; VIP ट्रीटमेंटवर भाजपने उपस्थित केला सवाल, See Grave Photos

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील दहशतवादी याकुब मेमनची कबर सजवण्यात आली. तिथे संगमरवरी फरश्या आणि एलईडी लाईट्स बसवण्यात आल्या. हे प्रकरण उचलून धरत भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबतच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जाब विचारला आहे.

Yakub Memon Grave (PC- Twitter)

Mumbai Blast Terrorist Yakub Memon: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon) च्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या आहेत. याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील दहशतवादी याकुब मेमनची कबर सजवण्यात आली. तिथे संगमरवरी फरश्या आणि एलईडी लाईट्स बसवण्यात आल्या. हे प्रकरण उचलून धरत भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबतच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जाब विचारला आहे. याकूब मेमनला टाडाच्या विशेष न्यायालयाने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरवले होते. याकुब मेमन हा त्या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचा भाऊ होता.

याकूब मेमनला टाडा न्यायालयाने 2007 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर 30 जुलै 2015 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील बडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ही समाधी सजवली होती, असे भाजपचे म्हणणे आहे. आजूबाजूला फरशा लावण्यात आल्या होत्या, दिव्यांची सजावट करण्यात आली होती. (हेही वाचा - Jalna: जालन्यातील Mantha Urban Cooperative बँकेत 12 कोटी 18 लाखांचा अपहार; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल)

मात्र, बडा कब्रस्तानचे प्रमुख शोएब खतीब यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शोएबच्या मते, याकूब मेमनची कबर सजवल्याचा आरोप खोटा आहे. खाली पडलेल्या आणि जमिनीत खाली असलेल्या सर्व कबरींभोवती संगमरवरी ठेवले होते. केवळ याकुब मेमनची समाधी सुशोभित करण्यात आली असे म्हणणे चुकीचे आहे. भाजपने या सर्व प्रकरणावरून हल्लाबोल केला असला तरी, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या निकटवर्तीयाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now