Chhatrapati Sambhaji Nagar: 'ॲनिमल' चित्रपटाच्या पोस्टवरून संभाजीनगरमध्ये तणाव, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने टाकली होती.

Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) 'ॲनिमल' (Animal)सिनेमावरून सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा पुढे आक्षेपार्ह धार्मिक वादापर्यंत पोहचली. शहरातील जिन्सी भागात रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात आली. तर, पोलिसांनी या प्रकरणी किशोर गणेश गव्हाणे याला अटक केली. पोलिसांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम समाजातील महत्वाच्या लोकांच्या मदतीने जमावाला शांत करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा - Jaipur Protest: करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर जयपूरमध्ये तणाव, समर्थकांकडून निदर्शने)

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरु होती. याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने टाकली होती. या पोस्टनंतर शहरात तणावाची परिस्थीती निर्माण झाली. जिन्सी पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमला. प्रकरण हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर जिन्सीतील पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली. सोशल मीडियावर मुस्लीम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील असे माहीत असुन सुध्दा जाणीवपुर्वक हिंदु व मुस्लीम धर्मीयामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्येशाने जाणीवपुर्वक इंस्टाग्रामवर मॅसेज टाकुन कृत्य केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान गुन्हयातील आरोपी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पळुन जात आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करुन आरोपी किशोर गणेश गव्हाणे याचा शोध घेवुन त्याला कन्नड येथुन ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.