Pune: पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी 17,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बांधकाम कंत्राटदार अटकेत
महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) एका रहिवाशासाठी पुणे महामंडळाकडून पाणी कनेक्शन (Water connection) मिळवण्यासाठी 17,000 रुपयांची लाच (Bribe) घेतल्याच्या आरोपाखाली नागरी बांधकाम कंत्राटदाराला (Construction contractor) अटक केली आहे.
महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) एका रहिवाशासाठी पुणे महामंडळाकडून पाणी कनेक्शन (Water connection) मिळवण्यासाठी 17,000 रुपयांची लाच (Bribe) घेतल्याच्या आरोपाखाली नागरी बांधकाम कंत्राटदाराला (Construction contractor) अटक केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चतुश्रृंगी विभागात तक्रार दाखल केल्यानंतर ब्युरोने महेश शिंदे याला मंगळवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. कनेक्शन देण्यासाठी शिंदे यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. हेही वाचा Refinery Project: रिफायनरी प्रकल्प कोकणातच, फक्त जागेत होणार बदल!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; आदित्य ठाकरे यांची माहिती
सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत, तसेच प्लंबरला 2 हजार रुपये द्यायचे आहेत, असे ठेकेदाराने तक्रारदाराला सांगितले. ब्युरोने सोमवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. दुसऱ्या दिवशी, ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी कर्वे रोडवरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा रचून शिंदे याला तक्रारदाराकडून 17,000 रुपयांची लाच घेताना अटक केली. महामंडळाचे अधिकारी आणि प्लंबर यांनीही लाच मागितल्याच्या दाव्याची ब्युरो चौकशी करत आहे.