IPL Auction 2025 Live

काँग्रेसच्या व्होटबँक राजकारणामुळे विकासात अडथळा, सोलापूर येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला

या वेळी बोलताना मोदी म्हणाले, आज गृहप्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. घराच्या चाव्या द्यायालाही मीच येणार. सोलापूर हे शहरही 'स्मार्ट सीटी' योजनेच्या यादीत आहे. लवकरच सोलापूरही उडान घेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Prime Minister Modi attacked Congress in Solapur | (Photo Courtesy: All India Radio)

Prime Minister Modi attacked Congress in Solapur: आमच्याही काळात विकासाच्या घोषणा होतात. पन्नास वर्षांपूर्वीही घोषणा होत असत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरत आहेत. मात्र, गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने केवळ व्होटबँकेचे राजकारण (Vote Bank Politics) केले. या व्होटबँकेच्या राजकारणामुळेच विकासात अडथळा आला. आमच्या कार्यकाळात आम्ही केवळ विकासाचे राजकारण करतो. व्होटबँकेचे नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी काँग्रेस (Congress) सरकारवर टीका केली. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापूर (Solapur) येथील विविध विकास कामांचे शुभारंभ मोदींच्या हस्ते झाला. यावेळी जाहीर सभेतून उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करतान ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी सोलापूरमध्ये पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 30हजार गृहप्रकल्पांचा शुभारंभ झाला. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, आज गृहप्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. घराच्या चाव्या द्यायालाही मीच येणार. सोलापूर हे शहरही 'स्मार्ट सीटी' योजनेच्या यादीत आहे. लवकरच सोलापूरही उडान घेईल. देशातल्या 100 शहरांना स्मार्ट सीटी बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. सरकारच्या 1 लाख कोटी रुपयांच्या योजनांचे काम सुरु असल्याचेही मोदींनी या वेली सांगितले. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, सोलापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करणार; जाणून घ्या कार्यक्रम)

दरम्यान, उजनी प्रकल्पाचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी उजनीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेन असेही मोदी म्हणाले.

ज्या ठिकाणी प्रकल्पाचे शुभारंभ करतो त्याच ठीकाणी त्याच प्रकल्पांचे मी उद्घाटनही करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.