IPL Auction 2025 Live

Nana Patole U-turn: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे घुमजाव म्हणाले, 'पाळत ठेवण्याच्या वक्तव्याचा विपर्यास, माझा आरोप केंद्र सरकारवर'

आपला आरोप राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारविरोधात आहे. मुंबईत आल्यावर आपण सविस्तर प्रतिक्रिया देणार आहोत, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Nana Patole | (Photo Credit : Facebook)

लोणावळा (Lonavla) येथील काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. या सनसनाटी आरोपानंतर महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन नाना पटोले यांनी घुमजाव करत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावत विपर्यास केल्याचे म्हटले आहे. आपला आरोप राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारविरोधात आहे. मुंबईत आल्यावर आपण सविस्तर प्रतिक्रिया देणार आहोत, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

लोणावळा येथील केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना पटोले यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिणीवर स्पष्टीकरण दिले. या स्पष्टीकरणात पटोले यांनी म्हटले की, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला. माझे आरोप हे केंद्र सरकारवर होते. राज्य सरकारविरोधात नाही. राज्य सरकारविरोधात आपल्याला कोणताही आरोप नाही. आपल्या वक्यव्याबाबत मुंबईला आल्यावर आपण सविस्तर स्पष्टीकरण देणार आहोत, असेही नाना पटोले यांनी म्हटले. (हेही वाचा, Nana Patole: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवतात)

नाना पटोले यांनी काय म्हटले होते?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आणि खळबळजन विधान केले आहे. या विधानामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. नाना पटोले यांनी म्हटले होते की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवतात. खरे तर नाना पटोले यांचा हा गंभीर आरोपच आहे. लोणावळा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना नाना पटोले यांनी हे आरोप केले आहेत. आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशी पुस्तीही पटोले यांनी आपल्या विधानासोबत जोडली. नाना पटोले यांच्या विधानामुळे महाविकासआघाडीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोर देत पुनरुच्चार केला होता की, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. असे असले तरी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेन. महाविकासाघाडीत आमचे मित्रपक्ष आहेत. हे आमचे मित्रपक्ष असले तरी निवडणुकांमध्ये त्यांचे प्लॅनिंग वेगळे असेल. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून वेगळे लढतो आहोत. आमची तयारी त्यादृष्टीने सुरु झाल आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्षच आहे. त्यामुळे एकत्र बसल्यावर काय निर्णय होतो ते पाहू. परतू, आजघडीला तरी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आघाडीत नेमके काय सुरु आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.