काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली गोवा मुख्यमंत्र्यांची भेट
काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी (29 जानेवारी) गोवा (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आहे.
काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी (29 जानेवारी) गोवा (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आहे. तर गोव्यातील विधानसभा भवनात जाऊन राहुल गांधी यांनी त्यांनी गळाभेट घेतली आहे. या दोघांमध्ये झालेल्या 15 मिनिटांच्या भेटीत राहुल गांधी यांनी पर्रिकर यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. तर मनोहर पर्रिकर दीर्घकाळ आजरी असून स्वादुपिंडाच्या आदाराशी सामना करत आहेत. मात्र दोघांमध्ये पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा झाली असून राफेल प्रकरणी कोणती चर्चा झाली नाही.
मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी आजवर दिल्ली, मुंबई आणि अमेरिका येथे आजारावर उपचार घेतले आहेत. गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन बाहेर आले होते. त्यानंतर ही आजारपणात पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पद योग्यरितीने सांभाळले. (हेही वाचा-खासगी दौऱ्यात असे असतात काँग्रेस अध्यक्ष; 'कॅप्टन कूल' राहुल गांधी यांचा न पाहिलेला अंदाज)
या भेटीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आजाद यांनी असे सांगितले की, या दोघांमधील एक वैयक्तिक भेट होती, तसेच सामाजिक नाती ही राजकीय पक्षामुळे संपली जातात असे नसल्याचे आजाद यांनी म्हटले आहे.