उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी दिली पक्ष सोडण्याची धमकी
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे संतप्त झालेले जालनामधील कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, "पक्षातील अनेक अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मी पक्षपदाचा राजीनामा देणार आहोत."
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे संतप्त झालेले जालनामधील कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, "पक्षातील अनेक अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मी पक्षपदाचा राजीनामा देणार आहोत." महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला, त्यामध्ये 26 मंत्री आणि 10 राज्यमंत्री बनले. गोरंट्याल म्हणाले की, शनिवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ते म्हणाले, "मी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेईन आणि पक्षाच्या पदाचा राजीनामा देईन. जालना नगरपरिषद, जिल्हा परिषदेचे पक्षाचे सदस्यही माझ्याकडे राजीनामे सादर करतील."
जालनातील सर्व तहसीलांमधून कॉंग्रेसचे अधिकारी यापूर्वीच बाजूला झाले आहेत, असा आमदार कैलाश यांनी दावा केला आहे. ते म्हणाले, 'पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केले व माझ्यासोबत न्याय करण्यात आलेला नाही.' ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. नगरमधील कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद म्हणाले की, गोरंट्याल हे तीन वेळा आमदार होते आणि ते यापूर्वी नगरसेवक देखील होते आणि जिल्ह्यात पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. महमूद म्हणाले, 'आम्ही राजीनामा पक्षाच्या नेतृत्वाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे."
दरम्यान, आज सकाळपासून शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तर हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या. ते देखील मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचं बोललं जात होतं. परंतु, तब्बल 9 तासांनी मौन सोडत अखेर सत्तर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.