Sharad Pawar And Sushil Kumar Shinde on Stage: शरद पवार यांना द्राक्षं भरवल्यावर सुशील कुमार शिंदे यांनी सांगितली राजकारणातील एण्ट्रीची कहाणी

खरे तर शरद पवार यांची करंगळी धरुनच आपण राजकारणात आलो. त्यांच्यामुळे राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवू शकलो.

Sushil Kumar Shinde, Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, शरद पवार यांच्यामुळेच आपण राजकारणात कसे आलो हे देखील सांगितले. हा सर्व कौतुक सोहळा शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांनी एकमेकांना द्राक्षं भरवल्यानंतर जाहीर कार्यक्रमात पार पडला. निमित्त होते सोलापूर येथील नान्नज येथील एका कार्यक्रमाचे. सोलापूर येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी किंग बेरी द्राक्ष वाण विकसीत केला आहे. या वाणाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार, सुळील कुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि इतरही मान्यवर एकत्र आले होते.

या कार्यक्रमात बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार आणि आपल्यात कोणतेही अंतर नाही. खरे तर शरद पवार यांची करंगळी धरुनच आपण राजकारणात आलो. त्यांच्यामुळे राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवू शकलो. दिल्लीमध्येही मी त्यांच्यासोबत सरकारमध्ये होतो. मनमोहन सिंह सरकारमध्ये शरद पवार कृषीमंत्री होते. ते कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कसा मिळे याचा ते सतत प्रयत्न करत असत.देशातील तांदूळ उत्पादनातही त्याच्या प्रयत्नामुळेच वाढ झाली देशाच्या डोंगराळ भागातही तांदूळ पिकवला जाऊ लागला, असे सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले. (हे ही वाचा, Udayanraje Bhosale Met Sharad Pawar: भाजप खासदार उदयनराजे भोसले घेणार शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या)

शरद पवार यांनी एखाद्याला पुढे न्यायचं ठरवलं तर ते करुनच दाखवतात. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे सरकार असताना त्यांनी मला सरकारमध्ये घेतले नव्हते. मग मी शेती करण्याचा निर्णय घेतला. आज माझ्याकडे जवळपास 34 एकर शेती आहे. पण, शरद पवार यांनी संधी दिली. एखाद्याला पुढे न्यायचं म्हटलं की शरदपवार पुढे घेऊन जातात. एखाद्याल सतत पुढे न्यायचं आणि त्याचं गुणगाण करायचं यात शरद पवार यांचा कुणीही हात धरु शकत नाही, अशा आठवणीही सुशील कुमार शिंदे यांनी सांगितल्या.

सुशील कुमार शिंदे यांनी 1978 या वरषातील गोष्टही सांगितली. ते म्हणाले, या निवडणुकीत आम्ही एकत्र होतो. शरद पवार यांनी मला निवडणुकीला उभे केले. सोबत पैसेही दिले. त्यांनी दिलेले 20 हजार रुपये घेऊन मी परत करायला गेलो. तर त्यांनी ते न घेता मला परत पाठवले. आज मी जो काही आहे तो शरद पवार यांच्यामुळेच आहे, असेही सुशील कुमार शिंदे म्हणले.

दत्तात्रय काळे यांचे वडील नानासाहेब कळे यांच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. आजच्या कार्यक्रमाला ते येणार की नाही निश्चिती नव्हती. जरा शंका होती. परंतू, या कार्यक्रमालाही ते आले. अशा कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या माणसाने येणे याचा देशभरात संदेश जात असतो. एका शेतकऱ्याने केलेली तपश्चर्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचालयाल मदत होते. तसेच, शरद पवार यांनी मनात आणलं तर ते कार्यक्रम बरोबर करतात अशी खोचक टप्पणीही शिंदे यांनी या वेळी केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif