Rahul Gandhi Thane Sabha: अदानी नव्हे 'मोदानी', विमानळ, पोर्ट, सगळी कंत्राटं एकाच व्यक्तीस; राहुल गांधी यांचे ठाणे येथून टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi) हेसुद्धा उद्योगपती आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे हे सरकार मोदी नव्हे तर 'मोदानी' सरकार आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

सर्व केंद्रीय तपास यंत्रणा, सरकारी उद्योग आणि देशातील संसाधणे ही एकाच व्यक्तीसाठी वापरली जात आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर केवळ दोन तीन टक्के लोकांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi) हेसुद्धा उद्योगपती आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे हे सरकार मोदी नव्हे तर 'मोदानी' सरकार आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी ते ठाणे येथील सभेतून बोलत होते. या सभेला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'नरेंद्र मोदी आणि अदानी एकच'

भारत जोडो न्याय यात्रा ठाणे येथे पोहोचताच केलेल्या भाषणात राहुल म्हणाले,  केंद्रातील मोदी सरकार हे सामान्य जनतेसाठी नव्हे तर जनतेला लुटण्यासाठी काम करत आहे. म्हणूनच तर देशातील संसाधणे एकाच व्यक्तीला दिली जात आहेत. विमानतळं, बंदरं, केंद्रीय संस्था, यंत्रणा या सर्व एकाच व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत आहेत. ही व्यक्ती म्हणजे गौतम अदानी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी वेगवेगळे नाहीत. हे एकच आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. सामान्य व्यक्तींच्या डोळ्यात धुळफेक करत त्यांचे लक्ष भरकटवले जाते आहे. जेणेकरुन मूळ प्रश्नांवर कोणीही बोलू नये. लोकांचे लक्ष भरकटवून त्यांना हवे ते निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या नाहीत, उद्योगधद्यांमध्ये वाढ नाही, असे असतानाच हे सरकार अग्निवीर सारखी योजना घेऊन येते. (हेही वाचा, Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai: राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावर सभा; कोण कोण राहणार उपस्थित? भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात)

राम मंदिर सोहळ्यात राष्ट्रपतींनाही प्रवेश नाही

अग्निवीर ही एक फसवी योजना आहे. ज्यामध्ये तरुणांना कोणत्याही प्रकारे निश्चित आणि हक्काची नोकरी मिळत नाही. चार लोकांना भरती करुन घेतले जाते. विशिष्ट कालावधी झाला की चारपौकी तीन लोकांना हकलून दिले जाते. हे सरकार कोणतीच योजना सामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन राबवत नाही. नुकतेच अयोध्येत राम मंदिर झाले. या सोहळ्याला सामान्य व्यक्तीना प्रवेश नव्हता. केवळ उद्योगपी, बडे सेलिब्रेटी, अभिनेते, खेळाडू आणि राजकीय नेत्यांनाच प्रवेश होता. सामान्यांचे सोडा या देशाचे राष्ट्रपती सामान्य आदिवासी महिला आहेत. त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रण दिले नाही. केवळ महिला आहे आणि त्यातही त्या आदिवासी आहेत म्हणूनच त्यांना राम मंदिर सोहळ्यास निमंत्रण दिले नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. (हेही वाचा, Modi Ka Parivar Vs Electoral Bonds: इलेक्टोरल बॉन्ड मोदी का परिवार? पंतप्रधानांनी 'X' वर शेअर केलेल्या व्हिडिओवर टीकेचा भडीमार)

दरम्यान, आगामी काळात आपले सरकार आल्यास सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले जातील, असेही राहुल गांधी म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीवरही त्यांनी भाष्य केले. इलेक्ट्रोल बॉंडच्या माध्यमातून भाजपने पैसा कमावला आणि त्यातील काही पैसा राज्यातील सरकारे पाडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरला असेही राहुल गांधी म्हणाले.