BMC Action Against Illegal Structure Of Masjid: धारावीतील बेकायदेशीर मशिदीवरून गोंधळ; कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड
कारवाईसाठी बीएमसीचे अधिकारी सकाळीच घटनास्थळी पोहोचले. बीएमसीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
BMC Action Against Illegal Structure Of Masjid: धारावीतील (Dharavi) बेकायदेशीर मशिदीवरून (Illegal Structure Of Masjid) सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील बेकायदेशीर मशिदीचा भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी दाखल झाले आहेत. येथे बीएमसीचे अधिकारी पोहोचल्यानंतर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बीएमसीच्या कारवाईपूर्वी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. कारवाईसाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. सध्या पोलिस अधिकारी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बेकायदेशीर मशिदीच्या वादावरून आता धारावीत नव धार्मिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी बीएमसी अधिकारी धारावीत दाखल -
मुंबईतील धारावी येथील मेहबुबा-ए-सुभानी मशिदीच्या बेकायदा बांधकामावर कारवाई होणार आहे. कारवाईसाठी बीएमसीचे अधिकारी सकाळीच घटनास्थळी पोहोचले. बीएमसीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीएमसीच्या कारवाईपूर्वी मुस्लिम समाजातील लोकही मोठ्या संख्येने मशिदीजवळ जमले आहेत. बीएमसी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम धारावी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर दोन्ही समाजाचे लोक एकमेकांशी बोलले. दरम्यान, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी पोहोचून लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Uddhav Thackeray on Dharavi Slum Redevelopment Project: सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन)
धारावीतील बेकायदेशीर मशिदीवरून गोंधळ, पहा व्हिडिओ -
मिलिंद देवरा आणि वर्षा गायकवाड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -
दरम्यान, मिलिंद देवरा आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ही कारवाई थांबवण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दोन्ही नेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बीएमसी अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यास सांगितले आहे.