Uday Samant on College Exams: यंदा ऑफलाईन परीक्षा देण्याची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानसिकता ठेवावी- उदय सामंत

त्यामुळे आता महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

Uday Samant | (File Photo)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर बंद असलेली महाविद्यालयं (Colleges) पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन (Offline) होणार की ऑफलाईन (Online)? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. "मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या लागल्या होत्या. मात्र यंदा लसीकरण करण्यात येत असल्याने परीक्षा ऑफलाईन घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी मानसिकता ठेवावी," असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मात्र ज्या ठिकाणी अडचणी असतील तिथे ऑनलाईन परीक्षा घेऊ, असंही ते म्हणाले. टीव्ही9 मराठी शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पुढे ते म्हणाले की, पुढे ते म्हणाले की, "महाविद्यालयं सुरु करताना दोन्ही लसींचे डोस पूर्ण करण्याची अट ठेवण्यात आली. त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झालं नसल्यांच समोर आलं. त्यामुळे आता महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईत आज 55 ठिकाणी लसीकरण करण्यात येतंय. राज्यात ठिकठिकाणी लसी दिल्या जात आहेत. या मोहिमेमुळे महाविद्यालयांचे ऑफलाईन वर्ग आणि ऑफलाईन परीक्षा घेता येऊ शकेल." (Mahatrashtra Colleges Reopen: राज्यातील महाविद्यालये सुरु, ऑनलाईन सत्र परीक्षा असलेल्या कॉलेजेसना दिवाळीनंतरचा मुहूर्त)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या मिशन महाविद्यालय लसीकरण मोहिनेचं आज वांद्र्यातील एम एम के महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी लसीचा एक डोस झाला आहे तर काहींनी दोन्ही डोस घेतले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचं 100 टक्के लसीकरण करण्याचं आमचं लक्ष्य आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ अशी खात्री आहे, असंही ते म्हणाले.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने आणि लसीकरण सातत्याने सुरु असल्याने अनेक सेवा-सुविधा पुन्हा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने काही नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.