मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज रायगड दौरा; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
आज सकाळी 11.30 वाजता गोल्डन गेट ने रो-रो बोटीतून मांडवा जेटीकडे प्रस्थान करतील. दुपारी 12.30 वाजता ते मांडवा जेटी येथे पोहोचतील.
महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यात 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. या चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक घरे उघडयावर पडली. जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या जागेचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री आपल्या काही मंत्र्यांसह आणि अधिका-यांसह हा भागाचा पाहणी दौरा करतील. आज सकाळी 11.30 वाजता गोल्डन गेट ने रो-रो बोटीतून मांडवा जेटीकडे प्रस्थान करतील. दुपारी 12.30 वाजता ते मांडवा जेटी येथे पोहोचतील.
निसर्ग चक्रीवादाळाने (Nisarga Cyclone) महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात धुमाकूळ घातला होता. मात्र, निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील (Raigad) नागरिकांना बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
कसा असेल मुख्यमंत्र्यांचा आजचा कार्यक्रम
सकाळी
11.30 वा गोल्डन गेटने रो-रो बोटीतुन मांडवा जेटीकडे प्रयाण
दुपारी
12.30 वा मांडवा जेटी ता. अलिबाग येथे आगमन
12.35 वा मोटारीने थळ ता. अलिबागकडे प्रयाण
12.50 वा थळ ता. अलिबाग येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी
1.20 वा मोटारीने थळ ता. अलिबाग येथून अलिबागकडे प्रयाण
1.35 वा अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथे आगमन
1.35 वा अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी
1.40 वा मोटारींने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागकडे प्रयाण
1.50 वा निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक
3.15 वा रो- रो बोटीने ॲारेंज गेटकडे प्रयाण
सायंकाळी
4.15 वा ॲारेंज गेट येथे आगमन
पालघर, पुणे आणि रायगडसह 14-15 जिल्ह्यात निसर्ग या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणाबाबचा अहवाल राज्य सरकार देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.