CM Uddhav Thackeray Rally: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये; शिवसेना सभास्थळी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा

पाठीमागील अनेक दिवसांपासून या सभेची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या सभेत (CM Uddhav Thackeray Rally at Aurangabad) ठाकरी तोफ कोणावर धडाडणार. या तोफेच्या निशाण्यावर कोण असणार? मुख्यत: आजच्या सभेतून शिवसैनिकांना कोणता संदेश दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

CM Uddhav Thackeray (Pic Credit - ANI)

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा आहे. पाठीमागील अनेक दिवसांपासून या सभेची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या सभेत (CM Uddhav Thackeray Rally at Aurangabad) ठाकरी तोफ कोणावर धडाडणार. या तोफेच्या निशाण्यावर कोण असणार? मुख्यत: आजच्या सभेतून शिवसैनिकांना कोणता संदेश दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे. सर्वाधिक उत्सुकता निर्माण केली आहे ती छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पुतळ्याने. शिवसेनेच्या आजच्या सभास्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याची घोषणा होणार का? अशी शक्यता प्रसारमाध्यमांनी बोलून दाखवली आहे. अर्थात ही शक्यता प्रत्यक्षात उतरण्याचीच मुळात सुतराम शक्यता नाही.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असोत किंवा विद्यमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत. औरंगाबाद येथे पक्षनेतृत्वाकडून होणाऱ्या प्रत्येक सभेला शिवसेनेच्या दृष्टीने प्रचंड मोठे महत्त्व असते. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा ही औरंगाबादमध्येच स्थापन झाली. ही शाखा 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या शाखेला 37 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन पक्षाकडून करणयात आले आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत अपक्षांमुळे सत्ताधारी, विरोधकांच्या नाकात दम, मनधरणीसाठी नाना क्लृप्त्या; हितेंद्र ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, सपा किंग मेकरच्या भूमिकेत)

मुख्यमंत्र्यांची सभा असूनही पोलिसांनी अगदी अखेरपर्यंत सभेसाठी परवानगी दिली नव्हती. अखेर 15 अटी शर्थींसह पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे. दरम्यान, अनेकांना उत्सुकता आहे ती औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण होणार का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 मध्ये झालेल्या सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली होती. त्यामुळेच प्रसारमाध्यमांनी बातम्यांचा जोरदार धडाका उडवला आहे की, आजच्या सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले जाण्याची शक्यता आहे.

निवडणुका आल्या की महाराष्ट्रात एक विषय हमखास चर्चिला जातो. आणि तो इतका हॉट आणि हिट होतो, की तिच्यावर सगळेच राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलायला लागतात. तो विषय म्हणजे संभाजीनगर की औरंगाबाद. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्याशिवाय होऊच शकत नाही. अनेक वर्षे या मुद्यावरून महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुद्धा नामांतराच्या विषय आघाडीवर असण्याची शक्यता आहे.