Maharashtra Assembly Monsoon Session 2020: 'आम्ही रात्री काम करत नाही, जे करतो ते दिवसाढवळ्या करतो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
त्यामुळे मुंबईचा विकास तसेच मंबईच्या पर्यावरणाला धक्का लागणार नाही हे पाहून काम करण्यास प्राधन्य देण्यात येईल. मुंबईतील आरे येथील 600 हेक्टर क्षेत्र जंगल परिसर म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकार आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने आणि कर्तव्य भावनेने पार पाडत आहे. काम करताना अहंकार असू नये. आम्ही रात्री काम करत नाही. जे करायचे ते दिवसा ढवळ्या करतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session 2020) सुरु आहे. या वेळी विधिंडळ सभागृहात ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, कोरना व्हायरस संकटाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकार प्रभावी काम करत आहे. कोरोना टेस्टसाठी राज्य सरकारने 530 लॅब सुरु केल्या आहेत. यासोबतच येत्या 15 सप्टेंबपासून माझं कुटुंब मझी जबाबदारी ही मोहीमही राज्य सरकार राबवत आहे. या मोहीमेंतर्गत कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध घरोघर जनजागृती करेन, असेही मख्यमंत्री म्हणाले.
मुंबई शहरात जन्मलेला पहिला मुख्यमंत्री होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले. त्यामुळे मुंबईचा विकास तसेच मंबईच्या पर्यावरणाला धक्का लागणार नाही हे पाहून काम करण्यास प्राधन्य देण्यात येईल. मुंबईतील आरे येथील 600 हेक्टर क्षेत्र जंगल परिसर म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त लाभ मुंबईकरांना कसा मिळेल हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Pravin Darekar On Ajit Pawar: अजित पवार यांच्या पायगुणामुळे भाजपची सत्ता गेली- प्रविण दरेकर)
कोरोना व्हायरस संकट काळात राज्य सरकारने आपली जबाबदारी कर्तव्य भावनेने पार पाडली आहे. आजही पाढत आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना सरकारी कर्मचारी, जनता या सर्वांचेच सहकार्य लाभले. कोरना व्हायरस संकट राज्यावर आहेच. या संकटामुळे राज्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. असे असले तरी येत्या वर्षात सरकार कृषी क्षेत्रात भक्कम काम करणार आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.