Ganesh Chaturthi 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ganeshotsav Wishes From State Politicians (Photo Credits: PTI and Wikimedia)

आज संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आपल्या भक्ताच्या घरी आगमन झाले. काही दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या या गणरायाचे भक्तीभावाने सारे गणेश भक्त आदरातिथ्य करत आहे. हा उत्साह असाच कायम राहावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणराया चरणी नतमस्तक होऊन सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आम्हा सर्वांना बळ दे असे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरीसह या राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून समस्त देशवासियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना असे सांगत शरद पवारांनी सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

तर देवेंद्र फडणवीस यांनीही गणेशोत्सव पर्वाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान या पवित्र सणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now