मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली मध्ये भेट घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उद्या (21 फेब्रुवारी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव  ठाकरे नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दुसरी भेट असणार आहे. यापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी पुण्यात आले होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले होते. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

तर गेल्या वर्षात महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पक्षाची तीन दशकांपासून असलेले गठबंधन तुटल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्रित लढवली. पण मुख्यमंत्री पदाच्या कारणावरुन दोन्ही पक्षात फूट पडल्याचे दिसले. तर शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात यावे यावर ठाम असल्याचा निर्णय घेतला होता. तर भाजपने शिवसेनेच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात ही आले.(GST भवनाला लागलेल्या आगीत स्वत:चा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज सुखरुप आणणारे शिपाई कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार)

त्यानंतर शिवसेनेने भाजप सोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. पहिल्यांदाच ठाकरे परिवारातील सदस्य हा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत एकूण 288 जागांपैकी भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती.