उद्यापासून धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी आणण्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'Lockdown' बाबत केली 'ही' महत्त्वाची घोषणा

"राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल" असेही ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार जनतेशी संवाद साधला. यात लोकांनी अनलॉकच्या टप्प्यात घातलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही परिस्थिती ओढावली असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तविली आहे. यामुळे एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 'उद्यापासून राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच "राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल" असेही ते म्हणाले.

राज्यात आपण काही दिवसांपूर्वी 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' अशी मोहिम राबवली होती. ती बदलून आताची परिस्थिती पाहून 'मी जबाबदार' अशी नवी मोहिम आपण सर्वांनी मिळून राबवूया असे त्यांनी सांगितले.हेदेखील वाचा- Uddhav Thackeray Address To Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

पाहूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

थोडक्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली असून कोरोनाच्या नियमांचे पालन करा. लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.