CM Uddhav Thackeray Live Updates: 'एमपीएससी' च्या परीक्षेची तारीख उद्या पर्यंत जाहीर केली जाणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत असून त्यांनी सुरुवातीला एमपीएससीच्या परीक्षेबद्दल भाष्य केले.
CM Uddhav Thackeray Live Updates: राज्यात वाढत्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचसोबत आज आरोग्य मंत्रालयाने सुद्धा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केल्याने चिंता व्यक्त केली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन संदर्भात पुढील एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या बाजूला 14 मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुण्यात विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत असून त्यांनी सुरुवातीला एमपीएससीच्या परीक्षेबद्दल भाष्य केले. कारण हा परीक्षेचा मुद्दा सुद्धा कोरोनाशी संलग्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(Nagpur Lockdown: नागपूर शहरामध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन)
तर गेल्या वर्षातच एमपीएससीच्या परीक्षेची तारीख ठरवण्यात आली होती. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता परीक्षेची तारीख ही फक्त काही दिवसांसाठी पुढे ढककली जाणार असून ती उद्यापर्यंत जाहीर केली जाऊ शकते असे ही म्हटले आहे. तर येत्या आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाणार असून त्यामागे फक्त कोविडचे कारण आहे. परीक्षेपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी सुद्धा केली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एखादा भडकवत आहे म्हणून बावरुन जाऊ नये असे ही त्यांनी सांगितले आहे.(CM Uddhav Thackeray On Lockdown: काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, एक-दोन दिवसांत निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
Tweet:
त्याचसोबत परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेत ती पार पाडली जाणार आहे. दरम्यान, परीक्षेवरुन विरोधकांनी राजकरण करु नये असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. पुढे उद्धव ठाकरे यांनी राज्यात गरज भासल्यास लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. परंतु तशी परिस्थिती ओढावू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच नागरिकांनी सुद्धा मुंबई शहरासह अन्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मास्क घालणे. सोशल डिस्टंन्सिंगसह नियमांचे पालन करावे असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. या व्यतिरिक्त नागरिकांनी कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे यावे असे सुद्धा आवाहन उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Tweet:
राज्यात आलेली ही कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असून नियमांचे पालन करावे. त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलल्याने नाराजी व्यक्त करु नये. कारण परीक्षेवेळी सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या स्टाफचे रिपोर्ट्स निगेटिव्ह असणे सुद्धा अत्यंत महत्वाचे असून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल कोणताही निष्काळजीपणा करण्यात येणार नाही असे अखेरीस उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.