CM Uddhav Thackeray Interview: महाविकासआघाडी सरकारचं भविष्य विरोधी पक्षाच्या हातात नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रिक्षासारखं असं म्हणतात असे संजय राऊत यांनी विचारले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हो हे सरकार रिक्षासारखं आहे खरं आहे. पण, ते गरिबांच वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात काय निवडायचं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरिबांच्या मागे उभा राहिन.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थिर आहे. ज्यांना पाडायचं आहे त्यांनी पाडून दाखवावं. मी पाहतो काय करायचं ते. माझ सरकार स्थिर आहे. माझ्या सरकारचं भविष्य विरोधी पक्षाच्या हातात नाही, असे ठणकाऊन सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षावर प्रहार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुखपत्र सामना (Daily Saamana) या दैनिकासाठी मुलाखत दिली या वेळी ते बोलत होते. सामनाचे संपादक, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली. ही मुलाखत काही भागांमध्ये प्रकाशित आणि प्रसारित होत आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीनचाकी सरकार आहे.. रिक्षासारखं असं म्हणतात असे संजय राऊत यांनी विचारले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हो हे सरकार रिक्षासारखं आहे खरं आहे. पण, ते गरिबांच वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात काय निवडायचं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरिबांच्या मागे उभा राहिन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करुन घेऊ नये की, मी मुख्यमंत्री झालो म्हणून बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Interview: मंत्रालयात कमी गेलो या आरोपात दम नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणले, तीन चांक तर तीन चाकं.... ती चालताहेतना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं हे तर तीन पक्षांच सरकार आहे. केंद्रात किती पक्षांच सरकार आहे? मी जेव्हा एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती, असा टोलांही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif